नवी दिल्ली: रक्षाबंधन आधी केंद्र सरकारने गरीब महिलांसाठी भेटवस्तू दिल्या आहेत. काही काळा आधी एलपीजी सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी बंद झाली होती. आता मंत्री मंत्रिमंडळाने एलपीजी सिलिंडरवर 200 रुपयांच्या सबसिडीला मंजुरी दिली आहे. यामुळे सर्व नागरिकांना गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त सिलिंडर मिळणार आहे. गॅस सबसिडी स्वस्त झाल्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सिलिंडर 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्रा कडून घेण्यात आला आहे. याशिवाय उज्ज्वलवा गॅस योजनेंतर्गत 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांना एक रुपयाही मोजावा लागणार नाही. त्यापेक्षा पाईप, स्टोव्ह आणि सिलिंडर मोफत दिले जातील. उज्ज्वला योजनेंतर्गत आधीपासून 200 रुपये सबसिडी होती, तर 200 रुपये अतिरिक्त सबसिडी स्वतंत्रपणे दिली जाईल.
आता उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना 400 रुपयांची सबसिडी मिळणार आहे. यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 99.75 रुपयांनी कमी केल्या होत्या. त्यादरम्यान, दरात कपात केल्यानंतर, दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1,680 रुपयांवर गेली होती. तथापि, 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत शेवटची सुधारणा गेल्या महिन्यात करण्यात आली होती.
वेगवेगळ्या कर स्लॅबमुळे, दर राज्यानुसार भिन्न आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम देशांतर्गत बाजारात एलपीजी सिलिंडरच्या किमतीवर होतो. 1 मार्चपासून 14.2 किलो LPG घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.त्याचवेळी, नुकतेच राजस्थान सरकारने 500 रुपयांना गॅस सिलिंडर देऊन जनतेला मोठा दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे ज्या मध्य प्रदेशात सरकारने रक्षाबंधनासाठी प्रिय भगिनींना 250 रुपये भेट म्हणून दिले आहेत, तिथे श्रावण महिन्यात 450 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे.