---Advertisement---

हरणखेड-निमखेड रस्त्याच्या रूंदीकरणाला ‘खो ;

by team

---Advertisement---

बोदवड :  तालुक्यातील हरणखेड येथील सरपंच रुपेश गांधी यांनी हरणखेड गावाकडून निमखेड गावाकडे जाणार्‍या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती मात्र मागणीला केराची टोपली दर्शवण्यात आल्यानंतर प्रशासनाचे लक्ष वेधले जाण्यासाठी त्यांनी निमखेडा फाटा गावाजवळ स्वतःवर डिझेल टाकत पेटवून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांच्याकडून डिझेलची कॅन हिसकावल्याने मोठा अनर्थ होण्यापासून टळला.

तर पुन्हा तीव्र आंदोलन

रस्ता अरुंद असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली एस.टी.घसरून रस्त्याच्या खाली उतरली होती. त्यावेळी मोठा अनर्थ टळला व ग्रामस्थांनी धाव घेत ट्रॅक्टरच्या माध्यमातून एस.टी.वर खेचून काढली होती. या सर्व घटना प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही हरणखेड गावाच्या नागरीकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने सरपंच यांनी सोमवारी डिझेल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने त्यांना वेळीच रोखण्यात आल्याने अनर्थ टळला.  मागणी पूर्ण न झाल्यास यापुढे यापेक्षाही मोठे पाऊल उचलले जाईल याबाबतचा इशारा सरपंचांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---