यावल : तालुक्यातील कोळवद येथील माहेरवाशीन ३० वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तसेच पतीला मोटारसायकल घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला व पैसे न आणल्याने घटस्फोट देऊन मोकळी हो, अशी धमकी देत तिला माहेरी सोडून देण्यात आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कोळवद, ता. यावल येथील माहेर असलेल्या नशिबा फिरोज तडवी (३०) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह विवरे बुद्रुक, ता.रावेर येथील फिरोज अरमान तडवी यांच्यासोबत १९ मे २०१३ रोजी झाला होता. विवाहानंतर पती तिच्या चारीत्र्यावर संशय घेऊ लागला व तिला शिवीगाळ करून मारहाण करू लागला व फारकत देऊन मोकळी हो, असे सांगू लागला तसेच माहेरच्या लोकांनी पतीला मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून तिचा छळ सुरू केला व तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला व तिला माहेरी सोडून दिले. विवाहितेच्या फिर्यादीवरून फिरोज अरमान तडवी, हसीना अरमान तडवी, सलमा आसीफ तडवी, असीफ तडवी, महमूद अरमान तडवी (रा. विवरे बुद्रुक) या पाच जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.