---Advertisement---

हरभजन सिंगने कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणावर केले मोठे वक्तव्य, म्हणाला…

by team
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंग यानेही कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरसोबत झालेल्या क्रूरतेवर आपले वक्तव्य केले आहे.  तो म्हणाला की,  “आपल्या देशाच्या मुलीसोबत कोलकाता येथे नुकतेच जे काही घडले ते खूप चुकीचे होते. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. या प्रकरणाला राजकीय मुद्दा बनवू नये. या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी माझी सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे.

त्याने पुढे सांगितले की, तिने तर आपला जीव सोडला आहे. भविष्यात आपले डोके शरमेने झुकावे असे काही घडू नये अशी आमची इच्छा आहे. आपण अशा देशाचे नागरिक आहोत जिथे आपण एकत्र राहतो. असे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

म्हणाला, “मला ममता दीदी, तिथल्या राज्यपालांना, वरिष्ठ पदांवर असलेले अधिकारी, नरेंद्र मोदीजी, राष्ट्रपती आणि मोठ्या नेत्यांना सांगायचे आहे की हीच वेळ आहे जिथे सर्वांनी एकत्र येऊन एक नियम बनवला पाहिजे. भविष्यात, एखाद्याला असे घृणास्पद कृत्य करावे से वाटले तरी, त्याचे परिणाम काय होतील हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment