टी-20 मालिकेचा हार्दिकच पुन्हा कर्णधार

तरुणभारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२।  भारतीय संघ जानेवारीमध्ये श्रीलंकेसोबत खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसह विश्वचषक 2024 ची सुरुवात करणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पुन्हा हार्दिक पांड्याला कर्णधारपदाची धुरा मिळणार आहे. नव्या निवड समितीच्या स्थापनेनंतर त्याच्याकडे औपचारिकपणे टी-20 कर्णधारपद सोपवण्यात येणार आहे. तर, भारताच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंचा यापुढे टी-20 संघात समावेश होणार नाही.

इनसाइडस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने रोहित, विराट कोहली मोहम्मद शमी, आर अश्विन दिनेश कार्तिक यांना अनौपचारिक संभाषणात कळवले आहे की, ते यापुढे भारताच्या टी-20 संघात समाविष्ट होणार नाहीत. भारत जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. वरीलपैकी एकाही खेळाडूला संघात संधी दिली जाणार नाही. रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल देखील या मालिकेत खेळणार नाही कारण तो लग्न करणार आहे.

बीबीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये नवीन निवड समितीची नियुक्ती केली जाणार आहे. जे भारतीय संघाबाबतचे सर्व औपचारिक निर्णय घेईल. पण काही नावांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे हे निश्चित आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी चर्चा झाली आहे. ते बीसीसीआयच्या निर्णयासोबत आहेत.

भारताने गतवर्षी 2011 मध्ये त्यांच्याच भूमीवर विश्वचषक जिंकला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाला कोणत्याही फॉरमॅटचा वर्ल्ड कप जिंकण्यात अपयश आले आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये आयसीसी स्तरावरील स्पर्धा जिंकली होती.