Haryana Assembly Election : हरियाणायात भाजपाच्या विजयाचे हे आहेत ५ फॅक्टर

Haryana Assembly Election : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस आज, मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८  वाजता सुरुवात झाली. एकूण ९०  जांगांसाठी या निवडणुकीत मतदान झाले. बहुमतासाठी ४६ जागांची मॅजिक फीगर आवश्यक होती. त्यानुसार, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. ही मतमोजणी लक्षात घेता भाजपाने बहूमताच्या आकड्याकडे आघाडी घेतली असून विजयाची औपचारीक घोषणा बाकी आहे. त्यानुसार भाजपाने भाजपाने विजयाची हॅटट्रिक साधली आहे. यापार्श्वभूमीवर जाणून घेऊया भाजपाच्या विजयातील पाच फॅक्टर कोणते ?

विकास कामे आणि योजना
हरियाणात आधी मनोहर लाल खट्टर आणि आता नायबसिंग सैनी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत आहे. याकाळात सरकारने अनेक विकासकामे आणि सरकारी योजना राबवत नागरिकांना दिलासा दिला आहे. या योजना आणि विकासकामांमुळे भाजपचा विजय सुकर झाला आहे.

जनतेशी थेट नाळ
हरियाणात भाजपाची जनतेशी थेट नाळ जुळली आहे. त्यामुळे सर्वसामन्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या या सर्वांचा भाजपचा चांगलाच अभ्यास आहे. या समस्या सोडविल्याने जनतेने भाजपवर विश्वास दाखवत तिसऱ्यांदा सत्तेची धुरा भाजपाच्या हाती दिली आहे.

जनतेचे प्रश्न सहज मार्गी
हरियाणाच्या ग्रामीण भागात, नागरिकांची बरीचशी कामे कुठल्याही प्रकारची लाच न देता पूर्ण झाली. लाच न देता नोकऱ्या मिळाल्या. हरियाणातील लाच खोरीमुळे जनता हैराण झाली होती. भाजपने सत्तेत येताच या लाच खोरीवर प्रहार करत जनतेला मोठा दिलासा दिला. हा ही एक महत्वाचा मुद्दा भाजपच्या विजयास कारणीभूत ठरतो.

मुख्यमंत्र्यांचा चेहरा
भाजपाकडे नायबसिंग सैनी यांच्या रूपाने एक कोरी पाटी असलेला चेहरा आहे. भाजपने नुकतेच मनोहर लाल खट्टर यांना हटवून नायबसिंग सैनी यांच्याकडे राज्याची कमान सोपवली आहे. याचाही फायदा भाजपाला मिळाला.

डबल इंजिन सरकार
राज्यातील जनतेने हरियाणा राज्य सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या दोन्हींवर विश्वास दाखविला आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारमुळे विकासकामांना चालना मिळाली. यामुळे हे सरकार डबल इंजिनचे ठरत भाजपाच्या हॅटट्रिकचा मार्ग सुलभ झाला.