---Advertisement---

मोठी बातमी ! हसन मुश्रीफांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली, कारण काय ?

by team
---Advertisement---

अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची वाशिमचे पालकमंत्री म्हणून मुश्रीफ यांची नेमणूक करण्यात आली होती, मात्र आता त्यांनी वाशिमचे पालकमंत्री पद सोडल्याची बातमी समोर आली आहे.  वैद्यकीय शिक्षणमंत्री असलेल्या मुश्रीफ यांना वाशिमचं पालकमंत्री पद सोपवण्यात आलं होतं. पण ते पद सोडण्याची इच्छा त्यांनी दर्शवली असून त्यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरपासून थेट वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. 26 जानेवारीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मुश्रीफ वाशिमला पोहोचले. मात्र, शासकीय ध्वजरोहणाचा कार्यक्रम पार पडताच कोणतीही बैठक न घेता त्यांनी थेट कोल्हापूरला परतले होते.

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्यावरून महायुतीतील पक्षांमध्ये अद्यापही धुसफूस सुरू आहे. मात्र असे असतानाच हसन मुश्रीफांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी संधी न मिळाल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नाराजी लपून राहिलेली नाही. 26 जानेवारीला ध्वजारोहण करून आल्यानंतर वाशिमकडे फिरकून परत न गेलेल्या हसन मुश्रीफ यांनी आता जबाबदारी सोडली आहे. 

पालकमंत्रिपद का सोडलं ?

मंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा सातत्याने 800 किमीचा प्रवास करण शक्य नसल्यामुळे पालकमंत्री पद सोडल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. कोल्हापूर ते वाशिम हा प्रवास जवळपास 600 किलोमीटरचा आहे. त्यामुळे वाशिमचं पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्या ठिकाणी येण्याजाण्यासाठी मुश्रीफ यांचे प्रवासात जवळपास  दोन दिवस जात होते. त्यामुळे कोल्हापूर या त्यांच्या मतदारसंघात त्यांना लक्ष देता येत नव्हतं . या कारणास्तव त्यांनी वाशिमचं पालकमंत्री पद सोडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता वाशिम जिल्ह्याला लवकरच नवीन पालकमंत्री मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment