हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव : जिल्ह्यातील तीन प्रमुख धारणांपैकी एक असणाऱ्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. परिणामी, हतनूर धरणाचे धरणाचे 41 पैकी बारा गेट सोमवार, 29 रोजी सकाळी दहा वाजता पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी हतनूर धरणात असलेल्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात 24 तासात पाऊस झाला आहे. यामध्ये बऱ्हाणपूर, डेड, तलाई, एरंडी, गोपालखेडा, चिखलदरा, लखपुरी, लोहटार व अकोला हे हतनूर धरणाची पाणलोट क्षेत्र असून या ठिकाणी झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे बारा दरवाजे पूर्णपणे सकाळी दहा वाजेला उघडण्यात आलेले होते

विदर्भ आणि मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात रविवारी पुन्हा वाढ झाली आहे. यामुळे तापीनदी दुथडी भरून वाहत आहे. आता सोमवार, 29 रोजी 12 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. हतनूर धरणाच्या उगमक्षेत्रावर जोरदार पाऊस होत असल्यामुळे धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले आहेत.

हतनूरमध्ये रविवार 28 रोजी रात्री बारा वाजता पाणी पातळी 210.500 मी. झालेली असताना एकूण पाणी साठा 214.00 दलघमी. तर एकुण पाणी साठा टक्केवारी 55.15 टक्के नोंदविण्यात आली. यावेळी धरणाचे आठ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते. तर 432 क्युसेकने पाणी विसर्ग करण्यात आले होते. तर सोमवार 29 रोजी सकाळी सात वाजता 210.740  मी. इतका पाणीसाठा जमा होत तो 57.63 टक्के नोंदविण्यात आला असून यावेळी धरणाचे आठ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर पाण्याची आवक वाढल्याने सकाळी 8 वाजता 226 दलघमी पाणीसाठा होऊन 58.25 टक्के नोंदविण्यात आला. तर अवघ्या दोन तासाने म्हणजेच दहा वाजता पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने 230.50 दलघमी पाणीसाठा झाल्याने 41 पैकी बारा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे तर 1822 क्सुसेकने विसर्ग सुरु आहे.