हतनूरचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने हतनुर धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

18 दरवाजे 1.00 मी. उघडले 

हतनूर धरणाचे ४१ पैकी ४ गेट ०.५ मी. उंचीने उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये  सद्यस्थितीत ४२३८ cusecs  इतका विसर्ग सुरू असून पुढील काही तासांत १५,००० ते २०,००० cusecs पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून जाण्याची शक्यता आहे. तर १८ दरवाजे १.०० मी. ने उघडण्यात आले आहे.

नागरिकांना आवाहन 

नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हतनूर प्रकल्प

दिनांक – 22/07/2024

वेळ -19.00  Hrs

पाणी पातळी – 210.720 मी.

एकुण पाणी साठा= 222.80 दलघमी.

एकुण पाणी साठा टक्केवारी = 57.42%

विसर्ग- 990.00 क्युमेक्स (34962 क्युसेक्स)

दरवाज्यांची सद्य स्थिती –

18 दरवाजे 1.00 मी. उघडे