---Advertisement---
Jalgaon News: गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाचे पुर्नागमन झाले आहे. गेल्या ४-५ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. काही भगात तर ढगफटी सदृष्य पाऊस देखील झाला. जोरदार झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील वाघूर, गिरणा, हातनूरसह अनेक प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे. पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्यातील मोठे-लहान प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अधून मधून पावसाची हजेरी लागत आहे. यामुळे हतनूर, गिरणासह वाघूर या मोठ्या प्रकल्पांसह अनेक लहान प्रकल्पातील पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी गिरणा धरणाचे ४ गेट ०.९० मीटरने व दोन गेट ०.६० मीटरने उघडण्यात आले. तर हतनूर धरणाचे ८ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले. पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे गिरणेला पूर आला आहे.
वाघूर धरणाचे १० दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे वाघूर नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. तसेच मन्याड धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ होत असून मन्याड धरणावरील असलेल्या माणिकपुंज प्रकल्पातून सुमारे 28000 ते 30000 क्युसेक्स वेगाने तसेच पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने मन्याड नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग (येवा) सुरू आहे. यासह मोर धरणाचे २ गेट ०. २ मीटरने, बहुळाचे ७ गेट दीड मीटरने, अंजनीचे ३ गेट ०.२० मीटरने, गूळ धरणाचे ३ गेट ०.५ मी., बोरी धरणाचे ९ गेट ०.१५ मीटरने उघडण्यात आले.
जिल्ह्यातील या प्रकल्पांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात वसर्ग होत असल्याने नद्यांच्या पाणी पातळात मोठी वाढ होत आहे. काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नदी काठच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
---Advertisement---