जळगाव : तत्कालीन क्रीडामंत्री व सध्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून शहरातील मेहरुण परिसरातील तब्ब्ल ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. रक्कम मंजूर झाल्याने क्रीडा संकुलाच्या कामास आता गती येणार आहे. लवकरच बांधकामासाठीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. याचा प्रारूप आराखडा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता.
जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांसाठी नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुल कार्यरत आहे. जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्यांसाठी जळगावमधील मेहरुण परिसरात ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास जागा मंजूर आहे. आता या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. रक्कम मंजूर झाल्याने क्रीडा संकुलाच्या कामास आता गती येणार आहे. लवकरच बांधकामासाठीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.