Heart attack on shaadi आंध्र प्रदेशातील ॲमेझॉनच्या एका कर्मचाऱ्याला लग्न समारंभात हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मरण्यापूर्वी हा तरुण मंचावर नवविवाहित जोडप्याला भेटवस्तू देताना दिसतो. तो मित्र आणि पाहुण्यांनी वेढलेला असतो, पण अचानक बेशुद्ध पडतो. या तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्राथमिक तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात घडली असून या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टेजवर गिफ्ट देताना एक तरुण पडताना झालेला दिसत आहे.
नवविवाहितांना भेटवस्तू देताना ‘त्याचा’ मृत्यू…पहा VIDEO
