जळगाव : घराकडे वारंवार चकरा मारणाऱ्या तरुणाला त्याचा जाब विचारल्याचा कारणावरून एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
शहरातील शाहुनगर येथे मयुर शशिकांत रानवडे हा तरूण आई-वडील, मोठा भाऊ कल्पेश व लहान बहिणीसह वास्तव्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहूनगरातील दोन तरूण रानवडे यांच्याकडून वारंवार ये-जा करून घराकडे बघायचे. शनिवारी रात्री ११ वाजता कल्पेश हा मिश्राजी सायकल मार्टजवळ उभा असताना त्याला ते दोन तरूण पुन्हा घराकडून जाताना दिसले. त्याने त्यांना थांबवून तुम्ही आमच्या घराकडे का बघता, तुमच्यामुळे आमची बहिण घाबरते, असा तो म्हणाला. याचा राग येवून दोघांनी कल्पेशला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली.
भांडण सोडविण्यासाठी आलेला भाऊ मयूर याला सुध्दा दोघांनी प्लॉस्टिकच्या पाईपने डोक्यात मारहाण केली. यात डोक्यात गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव होण्यास सुरूवात झाली. अखेर मयूर याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी रविवारी त्याने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.