Health Care Tips : वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल? जाणून घ्या माहिती …

Health Care Tips : उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे उष्माघाताची सर्वाधिक जोखीम अधिक असते. अतिसार लघवीला जळजळ होणं, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. वातावरणातील बदल व हवेतील आर्द्रता यामुळे मुलांमध्ये विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात. मुलांची त्वचा नाजूक असते. तेव्हा त्यावर प्रखर सूर्यकिरणांचा परिणाम होऊन त्वचा पोळली जाते व काळी पडण्याची शक्यता असते. तरी आपण या उन्हाळ्यात लहान मुलांची कश्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे याबाद्दल माहिती जाणून घेऊया

वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल?
मुलांना दिवसभर पाणी पिण्यास प्रोत्साहन द्या जेणेकरुन ते हायड्रेटेड राहतील विशेषतः मैदानी खेळादरम्यान त्यांना पुरेसे पाणी द्या. दररोज किमान 10-12 ग्लास पाणी प्या.

थकवा, डोकेदुखी, स्नायूंमधील वेदना आणि चक्कर येणे यासारख्या निर्जलीकरणाच्या लक्षणांकडे लक्ष द्या.

अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करण्यासाठी फळे, भाज्या आणि तृणधान्यांनी समृद्ध आहाराचे सेवन करा.

शर्करायुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थांचे सेवन मर्यादित करा. यातुन कमी पौषणमूल्य आणि ऊर्जा पातळीवर परिणाम होऊ शकतात.

फळे, सुकामेवा किंवा दही यांसारखे निरोगी पदार्थांचे सेवन करा.

घराबाहेर जाण्यापूर्वी कमीतकमी 15 मिनिटे आधी तुमच्या मुलांच्या उघड्या त्वचेवर SPF 30 किंवा त्याहून अधिक सनस्क्रीन लावा.

दर दोन तासांनी किंवा जास्त वेळा पोहल्यानंतर किंवा घाम आल्यावर पुन्हा सनस्क्रीन लावा.

टोपी, सनग्लासेस आणि सैलसर सुती कपडे यासारखे कपडे घाला.