---Advertisement---

हृदयद्रावक! आईनेच केली पोटच्या मुलाची हत्या अन्..

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । सध्या कुणाला कशाचीही भीती राहिलेली नाहीय, बिहारच्या औरंगाबादमधील मदनपूर ठाणा क्षेत्रातील शिवगंजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने चक्क आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा झाला असून संशयित महिलेला अटक करण्यात आली आहे.

सूत्रानुसार, संबधित महिलेने आपल्या १५ वर्षीय मुलाची हत्या केल्यानंतर मुलाचा मृतदेह घरातच खड्डा करून पुरला. त्यानंतर घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर बंद असलेले घर लगेचच सील करण्यात आले.

दरम्यान, यानंतर पाटणामधून एफएसएलची टीम दाखल झाल्यानंतर घरातील खड्डा खोदून त्यातून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment