---Advertisement---

हृदयद्रावक! लोहटारच्या तरुणाचं पोलीस होण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । पोलिस भरतीसाठी पळण्याचा सराव करीत असतानाच एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही हृदयद्रावक घटना जळगाव तालुक्यातील लोहटार येथे रविवारी पहाटे घडली. रामचंद्र कैलास शेवरे (वय २६) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

तालुक्यातील लोहटार येथे रामचंद्र कैलास शेवरे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. तो बांधकाम कारागीर होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांची मुलगी व मुलगा असा परिवार आहे. पोलिस भरती जाहीर झाल्याने, रामचंद्र आणि त्याची पत्नी असे दोघेजण मैदानी चाचणीसाठी पळण्याचा सराव करीत असत. नेमकी रविवारी पत्नी त्याच्यासोबत सरावासाठी आलेली नव्हती. रविवारी तो मित्रासोबत पळण्याचा सराव करीत होता.

हृदयविकाराने मृत्यू?
हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू ओढवल्याचा कयास काढला जात आहे. दि.३१ डिसेंबरला तो भडगाव तालुकयातील बात्सर या आपल्या सासुरवाडी व मामाच्या गावी येऊन गेल्याची माहिती मिळाली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment