Jalgaon : आठवडाभरापासून उन्हाच्या तडाखा जाणवत असून सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. जळगावकरांचा हा उष्णतेचा त्रास कमी न होता अजून वाढणार आहे. आगामी तीन ते चार दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून आगामी सप्ताहात देखील तापमान चढेच राहण्याची शक्यता असत्याचे हवामान अंदाज विविध अभ्यासकांनी वर्तविला आहे.
यावर्षी हिवाळा फारच कमी दिवसांचा जाणवला असून जानेवारी अखेरपासूनच बेमोसमी पावसामुळे तापमान कमी अधिक प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी मार्च मध्येच एप्रिल हिटचा तडाखा जाणवून येत असल्याचे दिसून आले असून एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा तब्बल ४० ते ४२ अंश असला तरी ४४ अंशादरम्यान उष्णता जाणवून येत असल्याचे दिसून आले आहे.
आगामी तीन चार दिवस उष्णतेची काहीली
सद्यस्थितीत कमाल ४३ तर किमान २३ ते २५ अंशादरम्यान नोंद झालेली आहे. आगामी दोन ते तीन दिवासांत तापमान ४४ पर्यंत जाण्याची शक्यता असून जळगावकरांसाठी आगामी काही दिवस हे तीन उष्णतेचे राहणार असल्याचेच हवामान विभागाने म्हटले आहे.
तापमान उष्ण, कोरडे आणि दमट
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ४३.८ अंश तापमानाची नोंद या सप्ताहात झाली असून आगामी सप्ताहात देखील रविवारनंतर कमाल तापमान ४४ अंशा दरम्यान असले तरी सोमवार आणि मंगळवार दरम्यान कमाल ४६ ते ४७ आणि किमान २६ ते २८ अंश राहणार आहे. दरम्यान हवामान कोरडे आणि उष्ण तसेच हवेतील आर्द्रता २० ते १० टक्के दरम्यान राहणार असल्याने उष्णतेचे चटके तिव्रतेने जाणवणार आहेत. तर वाऱ्याचा वेग देखील मंद राहणार असून किमान १० ते १४ कि.मी वेगाने वारे राहणार असल्याचे अॅक्यूवेदर वेधशाळेने हवामान अंदाज वर्तविला आहे.
जळगावात २५ एप्रिल रोजी यलो अलर्ट
जिल्हा प्रशासनाने हवामान विभागाने सावधतेचा इशारावजा दिलेल्या सूचनेनुस देलेल्या सूचनेनुसार २५ एप्रिल रोजी अतिउष्ण, दमट तापमान राहणार आहे. यात जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, परभणी नांदेड, हिंगोली, सोलापूर लातूरा आदी जिल्ह्यात यलो अलर्ट उष्ण लाटेसंदर्भात सावधता बाळगावी असेही सूचीत केले आहे.