तरुण भारत लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२२ । धुळे शहरानजीक मुंबई-आग्रा महार्गावर वरखेडी रोडवर दगडी कोळशाने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, या ट्रकची काही टायर्स, बॉडी, कॅबीनमधील सीट जळून खाक झाले. अग्नीशमन दलामुळे पुढील अनर्थ मात्र टळला.
दगडी कोळशाच्या ट्रकला भीषण आग; अग्निशमन दलाच्या सर्तक.. मोठा अनर्थ टळला
