जिल्ह्यात पावणेदोन लाख हेक्टर पिकाचे नुकसान, दोन लाखाहून अधिक शेतकरी बाधित

---Advertisement---

 

जिल्ह्यात गेल्या दोन तीन सप्ताहापासून पावसाच्या अतीवृष्टीमुळे पूर्व भागात रावेर, मुक्ताईनगरसह जामनेर तर पश्चिम पट्ट्यात पाचोरा, भडगाव, चाळीसगावसह पारोळा, एरंडोल तालुक्यांना झोडपून काढले आहे. यामुळे जिल्ह्यातील ८४१ गावांवर अतीवृष्टीचे संकट ओढवले आहे. यात पावणेदोन लाख हेक्टरवरील सुमारे दोन लाख ९ हजार २७३ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ३ जणांच्या मृत्यू सह दुधाळ व शेती कामाचे ५६३ पशुधन तसेच तीन हजाराहून अधिक कुक्कुट पक्षांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठे थैमान घातले आहे. गिरणा पट्ट्यातील तालुक्यांमध्ये पूर परिस्थीती असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. अतीपावसामुळे सुमारे पावणे दोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. गिरणा नदी पाणलोट क्षेत्रातील प्रकल्पातून सुमारे ७५ हजाराहून क्यूसेकचा विसर्ग झाल्याने नदीकाठच्या परिसरात महापूराचे स्वरूप आले होते. पावणे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक शेत पिकांचे नुकसान यंदाच्या खरीप हंगाम कालावधीत अस्मानी संकटात सुमारे २०८२ गावांमधील दिड लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल १लाख ६४ हजार ५११.७७हेक्टर क्षेत्राला नैसर्गिक संकटाने फटका दिला आहे. तर सुमारे २ लाख ९ हजार २७३ शेतकऱ्यांचे १ लाख ६४ हजार ५११.७७हेक्टर हेक्टरचे २९ सप्टेंबरपर्यंत नुकसान पंचनामे झाले असून अजून बरेच पंचनामे केले जात आहेत. हजारो कोटीं पाण्यात २९ सप्टेंबर पर्यंत सुमारे ३ हजार कोटीहून अधिकचे नुकसान झाले आहे. यात ८४१ गावांतील २ लाख ९ हजार २७३ शेतकऱ्यांचे १ लाख ६४ हजार ५११ हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान नोंद झाली आहे. तर अजून काही ठिकाणचे पंचनामे केले जात आहेत. त्यात २७ आणि २८ सप्टेंबरच्या अतीवृष्टीसह पुराने भर घातली आहे. कपाशी, केळीसह अन्य बागायत पिकांचे सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील १८३ कुटुंब बाधित पुर परिस्थीतीमुळे ३ जणांचा मृत्यू झाला. शिवाय दुधाळ, शेती ओढकाम करणारे लहानमोठे असे ५६३ पशुधन आणि ३१५८ कुक्कुट पक्षांचा देखील मृत्यू झाला आहे. अतिवृष्टी मुळे जिल्ह्यात १८३ कुटुंब बाधित झाले आहेत. याशिवाय ७२९ कच्ची घरे, ८५ पक्क्या घरांचे अंशतः तर ८५ कच्च्या आणि १६७ पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे. ६९९ टपरी दुकानाचे, ३३१६ घरांमध्ये आणि २७४ झोपड्यांमध्ये तसेच २८२ पशुधन गोठ्याचे पाणी शिरल्याने नुकसान झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---