---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच हवामान विभागाने जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. आगामी दोन दिवस ठराविक तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर २६ जुलैला जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यासाठी जिल्ह्यात यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. वेगवान वाऱ्यांमुळे उकाडा कमी होणार आहे.
जिल्ह्यात जून महिन्यात १०० टक्के सरासरी गाठलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या २२ तारखेपर्यंत तब्बल २५ टक्क्यांची तूट निर्माण केली आहे. केवळ जुलै महिन्याचा विचार केल्यास ही तूट ४६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
जिल्ह्यातील रावेर, यावल, धरणगाव आणि अमळनेर या तालुक्यांमध्ये पावसाची प्रचंड तूट दिसून येत आहे. यावल तालुक्यात ५८ टक्के, धरणगाव तालुक्यात ५२ टक्के, तर अमळनेर तालुक्यात ५० टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.
रावेर तालुक्यात मंगळवारपर्यंत ६५ टक्के पावसाची तूट होती, मात्र मंगळवारी रात्री येथे महिनाभरानंतर दमदार पाऊस झाला. मंगळवारी रात्री रावेर तालुक्यात ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, ज्यात खानापूर व रावेर या दोन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीही झाली. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, सावदा व खिर्डी महसूल मंडळांमध्ये पावसाची ७० टक्के तूट आहे.
२६ जुलैला मुसळधार पावसाचा अंदाज; यलो अलर्ट
दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. आगामी दोन दिवस ठराविक तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर २६ जुलैला जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यासाठी जिल्ह्यात यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. वेगवान वाऱ्यांमुळे उकाडा कमी होणार आहे.