---Advertisement---

Jalgaon News : ‘या’ तारखेपासून दमदार पाऊस, हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात यंदा मान्सून लवकर दाखल झाला असला तरी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन अपेक्षित असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

जुलै महिना सुरू झाल्यावरही दमदार पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. एकीकडे ८२ टक्के पेरण्या झाल्या असताना, दुसरीकडे काही तालुक्यांमध्ये पावसाची मोठी तूट असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. दरम्यान, पुढील आठवड्यात जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन अपेक्षित असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

मुसळधार पावसाचा अंदाज

जिल्ह्यात ६ जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह जिल्ह्यात दररोज तुरळक पावसाची हजेरी लागत आहे. मात्र, झालेल्या पेरण्यांसाठी हा पाऊस फारसा फायद्याचा ठरत नाही.

काय म्हणतात हवामान तज्ज्ञ ?

जळगाव जिल्ह्यात सरासरीप्रमाणे थोडीफार पावसाची तूट दिसत असली तरी जिल्ह्यात दररोज पावसाची हजेरी लागत असल्याने त्याचा काही प्रमाणात पिकांना फायदा होत असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले.

तसेच जुलै महिन्यात पावसासाठी पोषक स्थिती असून, या महिन्यात जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात सरासरीपेक्षा चांगला पाऊस होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---