---Advertisement---
जळगाव जिल्ह्याचे पर्जन्यमान ९५७४.९८ मिलिमीटरनुसार सरासरी ६३८.३३ मिलिमीटर आहे. दरम्यान, मान्सूनच्या तीन महिन्यात ८१ दिवसांपैकी २४ ऑगस्टपर्यंत केवळ ३९ दिवस पावसाने हजेरी आहे, तर ४२ दिवस हे कोरडेच असून, जुलैच्या शेवटच्या सप्ताहापासून दडी मारलेल्या पावसाने जिल्हाभरात १५ ऑगस्टनंतर जोरदार हजेरी लावली आहे.
जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान ५०९ मिलिमीटर पर्जन्यमान आहे. त्यानुसार सरासरी ४१९.४ मिलिमीटरनुसार १२१.३६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यात १३ हजार हेक्टरवरील खरीपाचे नुकसान झाले असले तरी २२ ते २५ दिवसांच्या खंडामूळे पावसाची तूट निर्माण झालेली होती. गत सप्ताहापासून जळगाव जिल्ह्यात १४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आठवडाभरात झालेल्या पावसाने काहीअंशी तूट भरून काढली आहे.
दरम्यान, मान्सूनच्या मध्यावरच ऑगस्ट सुरुवातीला पावसाची तूट निर्माण झाली होती. मात्र, ही तूट काही प्रमाणात भरून निघाली आहे. गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला असून यामध्ये सर्वाधिक ३५ मिलिमीटर पावसाची नोंद जळगाव तालुक्यात झाली आहे.
पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज
जिल्ह्यात या सप्ताहात पावसाने जोरदार हजेरी लावत दोन दिवसापासून जळगाव तालुका परिसर वगळता अन्य ठिकाणी उघडीप दिली आहे. आगामी सप्ताहात रविवार ते बुधवार गुरूवार वातावरणासह दरम्यान ढगाळ जोरदार पावसाची शक्यता आहे. तापमान कमाल २७ ते किमान २४ अंश दरम्यान तर हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ७८ टक्के आहे. तसेच वातावरणात प्रदूषणाचा निर्देशांक देखील उत्तम असून २८ नोंदवला गेला आहे. आगामी सप्ताहात रविवार (२४ ऑगस्ट) वगळता २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान वेगवान वारे तसेच मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
मान्सूनचा कालावधी लांबण्याची शक्यता
२०१९ पासून गेल्या ५ ते ६ वर्षांत २०२३ वगळता मान्सूनदरम्यान सप्टेंबर महिन्यात पावसाच्या सरासरीत मोठी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. यावर्षी देखील सप्टेंबर दरम्यान पावसाच्या सरासरीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात ऑक्टोबर मध्यापर्यंत परतीचा पाऊस लांबण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.