---Advertisement---
High BP : सध्याचे जीवन हे धावपळीचे आहे. या धावपळीच्या जीवनशैलीत व्यक्तीची आहारशैली चुकीची झाली आहे. चुकीची आहारशैली आरोग्यासाठी घातक ठरत आहे. सध्या लोकांमध्ये तेलकट पदार्थ खाण्याची सवय वाढली आहे. तेलकट पदार्थ चविष्ट असले तरी ते आरोग्याला घातक ठरतात.
तेलकट पदार्थामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयाला रक्तपुरवठा होण्यास समस्या निर्माण होते. ब्लॉकेजमुळे रक्तदाब वाढल्याने पुढे ह्रदय विकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. ही काळजी घेतल्यास घरच्या घरीच उच्च रक्तदाबाची समस्येवर नियंत्रण मिळवता येते.
हल्ली काहींना उच्च रक्तदाब तर काहींना कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होत आहे. या दोन्ही प्रकारच्या समस्या आरोग्यासाठी घातक ठरतात. रक्तदाबाच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे जीवासाठी घातक ठरू शकते. अशात तुम्हलाही उच्च रक्तदाबाच्या समस्या असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी जाणून घेऊया.
अशी घ्या काळजी
मिठाचे सेवन
प्रत्येक स्वयंपाक घरात जेवनात मीठ वापरले जाते. मीठ हे जेवणाची चव वाढवते. मात्र, मिठाचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरु शकते. मीठामध्ये असलेल्या सोडियममुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे दिवसातून 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.
चहा आणि कॉफी
सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करण्याची सवय अनेकांना असते. काही लोक दिवसभरात अनेकदा चहा घेतात. चहा किंवा कॉफीचे अतिसेवन करु नये. कारण हे सेवन आरोग्यासाठी घातक ठरते. कारण चहा आणि कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो. त्यामुळे शक्य असल्यास चहा-कॉफी पिणे बंद करावे.
तणाव कमी करा
सध्या अनेक जण तणावपूर्ण जीवन जगात आहे. ताणतणावामुळे शरीरातील रक्तदाब वाढते. यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येत वाढ होते. त्यामुळे तणावविरहित जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. छोट्या-छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करा.
शारीरिकरित्या सक्रिय राहा
व्यायामसह शारीरिकरित्या काम केल्याने आरोग्याला लाभ होतो. जे लोक तासंतास एका ठिकाणी बसून काम करतात. ज्यांना ब्लडप्रेशरसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे घरच्या घरी शारीरिक हालचालीसाठी लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करावा, पायी चलण्यासह घरातील असे कामे करा ज्यामुळे शारीरिक श्रम होईल. असे केल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रित मिळवण्यास मदत होती.
(टीप : लेखात दिलेली माहिती सामान्य आणि उपलब्ध माहितीच्या आधाराव आहे. तज्ञांचे मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)
---Advertisement---