---Advertisement---

‘हिंदू’ हाच मानव धर्म – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, धर्मजागरण न्यासच्या मुकुंदराव पणशीकर भवनाचे लोकार्पण

---Advertisement---

जगाने स्वीकारावा असा हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्मच मानवधर्म शिकवितो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी बुधवारी येथे केले. दक्षिण नागपुरातील भगवान नगर पोस्ट ऑफिसमागे धर्मजागरण न्यासची ‘मुकुंदराव पणशीकर भवन’ ही नवनिर्मित वास्तू उभारण्यात आली आहे. या वास्तूचे लोकार्पण सरसंघचालकांच्या हस्ते झाले. त्यानंतर जवळच असलेल्या धनश्री मंगल कार्यालयात त्यांचे उद्बोधन झाले.

यावेळी रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सह संघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया, धर्मजागरण प्रमुख शरद ढोले, विदर्भ प्रांत प्रमुख सुनील भूलगावकर, महानगर प्रमुख विजय कैथे व्यासपीठावर उपस्थित होते.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, धर्माचे कुठलेही कार्य हे पवित्रच असते. सम राज व राष्ट्रसेवा करणारा हाच खरा धर्म आहे. तसा आदर्श उभा केला तरच त्याचा स्वीकार होईल.

हिंदू धर्म विविधतांचा स्वीकार करण्याची शिकवण वण देतो. हिंदू धर्म मानवतेचे आचरण शिकवतो. मार्ग वेगवेगळे असले तरी साध्य सर्वांचे सारखेच असते. त्यामुळे इतरांचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न व्हायला नको. कुणाचा मार्ग कुठला आहे, यावर संघर्ष व्हायला नको. सनातन धर्म हा आत्मीयता व विविधतेचा स्वीकार करण्याची शिकवण देतो. भारतात विविधतेत एकता आहे. विविधतांचा स्वीकार करणे हाच खरा धर्म आहे.

ईश्वरप्राप्तीसह समाजकार्य हेदेखील धर्माचे उद्दिष्ट असते. धर्म सत्य, अहिंसेच्या मार्गावर चालत असेल तर समाजात संतुलन व शांती कायम राहते. धर्मजागरण होईल तेव्हाच हिंदू धर्माचे आचरण अस्तित्वात राहील. जगाला दिशा दाखविण्याची क्षमता भारतात आहे, यावर डॉ. मोहनजी भागवत यांनी भर दिला.

इमारत निर्माणकार्यात सहयोग करणारे धीरज महाकाळकर, विवेक देशकर व चंदनसिंह यांचा सत्कार करण्यात आला. रा. स्व. संघाचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, माजी आमदार सुधाकर कोहळे, राम हरकरे, मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता, महानगरातील भाग व नगर संघचालक आदींसह महानगर, विदर्भातील महिला-पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्तव्य पालनदेखील धर्म

कर्तव्यांचे पालनदेखील धर्म होय. तसेच राजधर्म, प्रजाधर्म, पितृधर्म पाळले गेले पाहिजेत. जीवनात कठीण प्रसंग आल्यास अनेकांचा संयम सुटतो, संतुलन बिघडते. मग ते सन्मार्ग सोडतात. पण पुरुषार्थी लोक न थकता, न थांबता पूर्ण शक्तिनिशी कठीणप्रसंगीही धर्माप्रति ठाम राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातही संकटे आलीत, पण त्यांनी शक्ती व युक्तीने मार्ग काढलाच. धर्मनिष्ठा ठाम व मजबूत हवी. धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्यावर अत्याचार झाले, पण त्यांनी धर्म सोडला नाही. असेच लोक आदर्श असतात, असेही डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---