अखेर ‘त्या’ बँक मॅनेजरच्या खुनाचे रहस्य उलगडले!

बुलढाणा : १ जानेवारी २०२३ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील हिरडव येथील स्टेट बँकेच्या मॅनेजरचा खून झाला होता आणि परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने लावला आहे.

सविस्तर वृत्त असे की,१ जानेवारी २०२३ रोजी हिरडव येथील स्टेट बँकेच्या मॅनेजरचा मृतदेह मेहकर तालुक्यातील सारंगपूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात आढळून आला होता. यावेळी पोलिसांना रक्ताने माखलेला चाकू, दोन मोबाईल फोन देखील आढळून आले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने तपास चक्र फिरवत मेहकर येथील लॉजवर ज्या ठिकाणी स्टेट बँकेचे मॅनेजर उत्कर्ष पाटील राहत होते. त्या लॉजचा मॅनेजर गणेश देशमाने यानेच बँक मॅनेजरकडे भरपूर पैसे असतील म्हणून बँक मॅनेजरला थर्टी फर्स्ट ची पार्टी साजरी करायला घेऊन जाऊन चाकूने गळा कापून खून केला होता .

या संपूर्ण खुनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने लावला असून आरोपीला डोंबिवली येथून अटक करण्यात आली आहे.