४८ वार्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती,लोकसभेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक…

लोकसभा सभापतिपदासाठी सत्ताधारी आणि विरोधक पांच्यात सहमती होऊ न शकल्यामुळे आता या पदासाठी निवडणूक अपरिहार्य झाली आहे. या पदासाठी सत्ताधारी रालोआचे ओम बिर्ता आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीचे के. सुरेश यांच्यात बुधवारी लढत होत आहे.
भाजपाने सभापतिपदासाठी ओम बिर्ला यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवार बनवले आहे. बिर्ला यांनी आज सकाळी लोकसभा महासचिवांच्या दालनात उमेदवारी अर्ज भरला. यावेळी गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच रालोआचे अन्य नेते उपस्थित होते. दुसरीकडे विरोधकांच्या

आघाडीतर्फे काँग्रेसचे के. सुरेश आपला अर्ज दाखल केला.बुधवारी सकाळी ११ वाजता या पदासाठी निवडणूक होणार आहे. संख्याबळाचा विचार करता रालोआचे ओम बिर्ला यांचा विजयनिश्चित मानला जात आहे.पंतप्रधान मोदी यांच्या कथनी आणि करणीत अंतर असल्याचा आरोप राहुल गांधी केला.भाजपाचे नेते राजनाथसिंह यांचा खडगे यांना दूरध्वनी आला होता.सभापतिपदासाठी सत्ताधारी आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी केली होती.त्यावर त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी आम्ही दर्शवली होती, पण विरोधी आघाडीसाठी उपसभापदाची मागणी आम्ही केली होती. मात्र,राजनाथसिंह यांनी त्याबाबत आम्हाला नेमके आश्वासन दिले नाही. मी तुम्हाला नंतर दूरध्वनी करतो. असे ते म्हणाले होते. आम्ही सोमवारपासून मंगळवार सकाळपर्यंत वाट पाहिली. पण राजनाथसिंह यांनी आमचे नेते खडगे यांना दूरध्वनी केला नाही. आमच्या नेत्याचा त्यांनी एकप्रकारे
अपमान केला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला