भुसावळात हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची चौकशी, ३८ गुन्हेगारांची डिवायएसपी गावितांनी घेतली झाडाझडती

---Advertisement---

 


भुसावळ : नगरपालिका निवडूकीच्या पार्श्वभुमीवर भुसावळ शहरातील तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिसांच्या रेकॉर्डवर हिस्ट्रीशीटर म्हणून नोंद करण्यात आलेल्या एकूण ३८ गुन्हेगारांची उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्याकडून झाडाझडती घेण्यात आली. या वेळी प्रत्येक गुन्हेगाराला समोर बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली.

नगरपालीका निवडूकीच्या पार्श्वभुमीवर शहरातील बाजारपेठ पोलिस स्टेशन, शहर पोलिस स्टेशन आणि तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत सराईत व पोलिस रेकॉर्डनुसार हिस्ट्रीशीटर म्हणून नोंद झालेल्या गुन्हेगारांना भुसावळ उपविभागीय पोलिस आधिकारी संदिप गावीत यांचेकडून शनिवार ( ता. ८ ) बोलविण्यात आले होते.पैकी ३८ गुन्हेगार हजर होते.सध्या गुन्हेगार गुन्हेगारी करीत आहेत का, गुन्ह्यात या सर्वांचा सहभाग नेमका कसा आहे, गुन्हेगारांशी यांचे काही साटेलोटे आहे का, याबाबतची सर्व माहिती या गुन्हेगारांकडून घेण्यात आली. या गुन्हेगारांकडून त्यांचे सध्याचे पत्ते, फोन नंबर, कुटुंबातील इतर सदस्यांचे संपर्काचे क्रमांक याची माहिती घेण्यात आली.

डीवायएसपी गावित यांनी बोलावलेल्या प्रत्येक हिस्ट्रीसिटरची हजेरी घेतली. कोणावर आता काय गुन्हे आहे? हल्ली त्यांचा चरितार्थ कसा सुरू आहे ? ते काय काम धंदा करत आहेत ? त्यांचे मित्र कोण? गत सहा महिन्यांत कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले, कधीपासून गुन्हे दाखल नाही, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर करण्यात आली. निवडणुकीच्या काळात कोणीही गर्दी, गोंधळ करू नये, कुठल्याही इच्छुक उमेदवारांना दमबाजी करू नये अशा सुचना देण्यात आल्या. तर सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. स्थानिक पोलिस ठाण्यात परवानाधारक शस्त्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.कायदा सुव्यवस्था राखणे आणि मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर नजर आहे. गेल्या दहा वर्षांत निवडणुकांच्या अनुषंगाने दाखल झालेले गुन्हे आणि गुन्हेगारांची यादी पोलिसांनी काढली आहे. याशिवाय गेल्या दोन वर्षांत दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवरही प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. सराईतांवर तात्पुरती हद्दपारी, चांगल्या वर्तनाचे प्रतिज्ञापत्र लिहून घेणे, समज देणे, स्थानिक पोलिस ठाण्यात नियमित हजेरी लावण्याच्या कारवाया केल्या जात आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांचेकडून पोलिस ठाणे निहाय याचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

सोशल मीडियातून निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. यातून विविध राजकीय पक्षांसह धार्मिक, जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची सोशल मीडियावर विशेष नजर आहे. सायबर सेलकडून काही संशयित खात्यांची नियमित पडताळणी केली जात आहे. कोणीही आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करू नये, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

शहरासह परीसरात ७८ परवानाधारक शस्त्रे आहेत. निवडणूक काळात यांचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्व शस्त्रे स्थानिक पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा रक्षक, खेळाडू आणि शासकीय कर्मचारी वगळता इतरांची शस्त्रे जमा केली जाणार आहेत.

आचारसंहिता लागल्यापासुन शहर वाहतूक नियंत्रण विभागाकडून मद्यसेवन करून वाहने चालवण्याचे२५ते ३० गुन्हे दाखल करून न्यायालयात रवाना केले आहेत तर दररोज अशीच मोहिम सुरू असेल गांजा, चरस, दारू अशा अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक, विक्री रोखणे. हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर कारवाई करणे. मटका आणि जुगार अड्डे बंद करणे. यासह बेहिशेबी पैसे आणि मतदारांना आमिष दाखविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची वाहतूक रोखण्यास प्राधान्य दिले जाईल, या दृष्टीने भुसावळ शहरात पोलिसांचे कार्य सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---