पाचोरा शहरातील हिवरा नदीला महापूराची स्थिती; नपा प्रशासनाकडून नागरिकांचे अन्यत्र स्थलांतर

---Advertisement---

 

पाचोरा शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीला मोठा महापूर आला असून, जामनेर जळगाव महामार्गासह नदीच्या दोन्ही पुलांवरून पाणी वाहत आहे. नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने वेळीच दक्षता घेत नदीकाठच्या नागरिकांना ध्वनिक्षेपक द्वारे नदीपाणी पातळी वाढत असल्याने धोक्याचा इशारा देत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले. तसेच नदीकाठचा परिसर रिकामा केला.

नागरिकांसाठी धोक्याचा इशारा

गेल्या आठ पंधरा वर्षांच्या इतिहासात हिवरा नदीला सर्वात मोठा पूर असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नदीकाठच्या परिसरातील गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यासह नदीपात्रात जाणे किंवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नये असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

पातळी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने येत्या काही तासांमध्ये अजून जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे पाण्याची पातळी आणखी वाढू शकते. त्यामुळे, प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथक सक्रिय झाले आहे.

रेल्वे भुयारी मार्ग बंद

मध्य रेल्वेचा शहराला जोडणारा भुयारी मार्गात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता बंद झाला आहे.

नागरी वसाहत परिसरात नदीचे स्वरूप

शहरातील नवीन नागरी वसाहती परिसरात शेतशिवारातील नाल्याचे मार्ग प्रवाहित होऊन नदीचे स्वरूप येऊन परिसर जलमय झाले असल्याचे दिसून आले. भडगाव शहरात देखील कॉलनी वसाहती परिसरात अशीच परिस्थिती असल्याचे दिसून आले आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---