HMPV Virus : सावधान! महाराष्ट्रात ‘एचएमपीव्ही’चा शिरकाव; शासनाने जारी केल्या ‘या’ मार्गदर्शक सूचना

#image_title

HMPV Virus : चीननंतर भारतातही ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही)चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशात आतापर्यंत आठ रुग्ण आढळले असून, केंद्र आणि राज्य सरकार अर्लट मोडवर आहेत. मात्र, हा श्वसनविषयक आजार जुना असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

WhatsApp Image 2025 01 02 at 44546 PM 1

सावधगिरीसाठी मार्गदर्शक सूचना जारी

सोमवारी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. बैठकीत ‘एचएमपीव्ही’च्या संदर्भातील माहिती आणि मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. तसेच जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली उपचारांची दिशा ठरवण्यासाठी कृतिदलाची स्थापना करण्यात आली.

 नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी 

खोकला किंवा शिंका येत असल्यास तोंड व नाक रुमाल किंवा टिशू पेपरने झाका.
साबणाने हात धुवा किंवा अल्कोहोलिक सॅनिटायझर वापरा.
ताप, खोकला असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
पुरेसे पाणी प्या, पौष्टिक आहार घ्या, आणि घरात व्हेंटिलेशनची काळजी घ्या.
हस्तांदोलन टाळा, टिश्यूचा पुनर्वापर करू नका, आणि आजारी व्यक्तींपासून दूर राहा.

एचएमपीव्हीची तपासणी आणि उपचार

एचएमपीव्हीची तपासणी घशातील लाळेच्या नमुन्याद्वारे केली जाते. सध्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत या तपासण्या सुरू आहेत. या आजारासाठी कोणतेही विशेष औषध नाही, त्यामुळे लक्षणानुसार उपचार केले जातात. यावर लसही उपलब्ध नाही.

सामान्य लक्षणे आणि गंभीर परिणाम

फ्लू, खोकला, ताप, नाक बंद होणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे ही ‘एचएमपीव्ही’ची सामान्य लक्षणे आहेत. गंभीर परिस्थितीत ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियासारखे आजार होऊ शकतात. संसर्गानंतर तीन ते सहा दिवसांत लक्षणे प्रकट होतात.

नागरिकांनी घाबरून जाण्याऐवजी सावधगिरी बाळगावी आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.