अमित शाहांचा संभाजीनगर दौरा रद्द, काय कारण?

संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १६  सप्टेंबरला  मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरात येणार होते. पण  अमित शाहांचा औरंगाबाद दौरा आता रद्द झाला आहे. कारण १७  सप्टेंबर रोजी अमित शाह यांचे वेळेचं नियोजन होत नसल्यामुळे,औरंगाबादचा दौरा रद्द करण्यात आल आहे.

अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.  अमित शाहांच्या दौऱ्यासाठी भाजपकडून आणि प्रशासनाकडून सर्व जय्यत तयारी करण्यात आली होती. पण आता मात्र दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यावेळी गृहमंत्री अमित शाह मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. त्याचबरोबर अमित शाह यांच्या सभेची देखील भाजपकडून तयारी करण्यात आली होती. मात्र, आता हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व पक्षीय नेत्यांच्या दौऱ्यात मोठी वाढ झाली आहे. म्हणूनच अमित शाह यांचा उद्या छत्रपती संभाजीनगरात दौरा ठरलेला होता. पण आता  दौराच रद्द झालेला आहे.