Honda QC1: होंडाने लाँच केली त्यांची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत आणि रेंजबद्दल जाणून घ्या सविस्तर…

Honda QC1:  होंडाने ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये त्यांची नवीन QC1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. कंपनीने या नवीन स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ९०,००० रुपये ठेवली आहे आणि तिचे बुकिंग देखील सुरू केले आहे. ग्राहक फक्त १००० रुपये देऊन ही स्कूटर बुक करू शकतात.

५ रंगांचे पर्याय
या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याची डिलिव्हरी सुरू होईल. होंडा QC1 मध्ये तुम्हाला ५ रंगांचे पर्याय मिळतील, ज्यात पर्ल शॅलो ब्लू, पर्ल मिस्टी व्हाइट, पर्ल नाईटस्टार ब्लॅक, पियर सेरेनिटी ब्लू आणि मॅट फॉगी सिल्व्हर मेटॅलिक यांचा समावेश आहे. नवीन QC1 ही होंडाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ती एका चार्जवर ८० किमी अंतर कापण्यास सक्षम आहे.

हेही वाचा : 1 लाख रुपयांचे झाले 91 लाख, तुमच्याही पोर्टफोलिओत आहे का ‘हा’ मल्टीबॅगर स्टॉक्स?

उत्तम वैशिष्ट्ये
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, होंडा QC1 ने ५-इंच एलसीडी क्लस्टर, फुल एलईडी लाइटिंग, यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट सारखी प्रगत वैशिष्ट्ये सादर केली आहेत. तसेच, ग्राहकांना त्यात २६-लिटर स्टोरेज मिळेल. यात २ रायडिंग मोड आहेत – इको आणि स्टँडर्ड. सस्पेंशनसाठी, ही स्कूटर समोर टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक अ‍ॅब्झॉर्बर वापरले आहेत . ब्रेकिंगसाठी ड्रम ब्रेक दिले आहेत. यामध्ये मोबाईल किंवा इतर लहान वस्तू ठेवण्यासाठी लहान स्टोरेज आहे. याशिवाय, त्यात एक USB चार्जर देण्यात आला आहे.

बॅटरी आणि रेंज
नवीन Honda QC1 मध्ये 1.5kWh बॅटरी पॅक आहे जो पूर्ण चार्ज केल्यावर 80 किमीची रेंज देतो. हे 1.8kW BLDC मोटरने सुसज्ज आहे आणि त्याचा टॉप स्पीड 50 किमी/तास आहे. 330-वॅट चार्जरने त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 तास 50 मिनिटे लागतात, तर 0-80% चार्ज होण्यासाठी 4 तास 30 मिनिटे लागतात. ही स्कूटर 90,000 रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लाँच करून, Honda ने स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना खुश खबर दिली आहे.