वाहकाचा प्रामाणिकपणा; एसटीमधील वस्तू केली परत

धरणगाव : राज्य परिवहन मंडळाच्या शिंदखेडा आगारातील वाहक राहुल विंचुरकर यांनी धरणगाव येथील प्रवासी सुरेखा जैन यांची बसम ध्ये राहिलेली वस्तू परत करून प्रामाणिकपणाचे प्रत्यय आणून दिला.
धरणगाव येथील रहिवासी सुरेखा जैन व सुरेखा वीरचंद जैन हे जळगाव इथून सायंकाळी ५ वाजता धरणगाव येथे येण्यासाठी (क्रमांक १८५४) जळगाव – शिंदखेडा बसमध्ये बसले व धरणगाव येथे सायंकाळी सहाला उतरले. त्यावेळेस घाईघाईत गाडीत एक डाग (वस्तू) विसरले. घरी आल्यावर काही वेळानंतर लक्षात आले की, आपण एक वस्तूचा डाग विसरलो, तत्काळ त्यांनी हा प्रसंग प्रतीक जैन यांना सांगितला.
त्यांनी शिंदखेडा येथील मित्र ज्ञानेश्वर परदेशी यांना संपर्क साधला व हकीकत सांगितली. भाऊ लगेचच शिंदखेडा डेपोते पोहोचले व ऑफिसला संपर्क केला. काही वेळापूर्वीच ही गाडी येथे आली आहे व वाहक व चालक हे रेस्ट रूमला जेवणाला गेले आहेत.
ज्ञानेश्वर तेथे पोहोचले असता वाहक राहुल विंचुरकर यांनी आपला डाग (वस्तू) सुरक्षित माझ्याजवळ आहे, आपण मला तिकीट दाखवा, तत्काळ प्रतीक जैन यांनी तिकीट व्हॉट्सअप करीत संपर्क केला व खात्री करून विंचुरकर यांनी श्री ज्ञानेश्वर परदेशी शिंदखेडा यांच्याकडे ती वस्तू सुपूर्द केली व आभार मानले. त्यांना खुशाली म्हणून काही पैसे देऊ केले परंतु त्यांनी ते नम्रपणे नाकारले.
त्या वस्तूचे जरी खूप जास्त आर्थिक मूल्य नसले तरी ‘प्रामाणिकपणा’ हा महत्वाचा आहे. सर्वात शेवटी वाहक विंचुरकर यांनी आपला परिचय देत ते धरणगाव येथील रहिवासी असे सांगितले.