---Advertisement---
Horoscope 19 October 2025 : पंचांगानुसार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी आश्विन कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी. दिवाळी पर्वातील हा महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस अनेक राशींसाठी नवीन आशा घेऊन येईल. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस काही राशींना करिअर, संपत्ती, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात यश मिळवून देणारा ठरेल. तर काही राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी कसा असेल हा दिवस.
मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी अजचा दिवस खूप शुभ आहे. आज तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी आणि घरगुती कामे दोन्ही सांभाळताना तुमची तारांबळ उडेल. तुम्ही दुपारपर्यंत व्यस्त राहाल. तुम्हाला धनलाभ होईल, पण तुम्हाला अनावश्यक खर्चही करावा लागेल.
वृषभ राशी
आज तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. काही मनोरंजक घटना घडतील. आजचा दिवस लाभ आणि नवीन संधी देणारा ठरेल. आर्थिकस्थिती सामान्य राहील. कोणीशीही बाद टाळत बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मिथुन राशी
आज आर्थिकदृष्ट्या नफा मिळवून देणारा आहे. परंतु तुम्हाला मानसिक तणावांवर मात करावी लागेल. कामात प्रगती होईल. हुशारीने निर्णय घ्या. घरगुती खर्च वाढेल. पैशाशी संबंधित समस्या संध्याकाळपर्यंत सोडवल्या जाऊ शकतात.
कर्क राशी
तुमच्या दिवसाची सुरुवात गोंधळात होईल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. विद्यार्थी प्रगती करतील. आरोग्य थोडे कमकुवत असू शकते.
सिंह राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी संमित्र स्वरुपाचा आहे. संयमाने आणि शांततेने काम करत राग आणि वाद टाळा. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा.
कन्या राशी
आजचा दिवस कठोर परिश्रमाचा आहे. तुमचे कठोर परिश्रम भविष्यात फायदा देतील. कामात सावधगिरी बाळगा. नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून आर्थिक निर्णय हुशारीने घ्या.
तूळ राशी
आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. आज तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. कला, फॅशन आणि सौंदर्याशी संबंधित लोकांना फायदा होईल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि व्यावहारिकतेने वागा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक राशी
आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस आहे. वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपारपूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करा. तुम्हाला सरकारी कामात यश मिळेल. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
धनु राशी
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा आहे. नकारात्मकता प्रबळ होईल. कामात निष्काळजी होऊ शकता. दुपारपासून परिस्थिती सुधारेल. संध्याकाळी मनोरंजनातून आनंद मिळू शकेल. आरोग्याची काळजी घ्या.
मकर राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुम्हाला मान-सन्मान मिळेल. परंतु आर्थिक अडचणी कायम राहतील. वेळेवर कामे पूर्ण करूनही तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही. तुमचे आरोग्य थोडे कमकुवत असू शकते.
कुंभ राशी
दिवस सामान्य राहील. आरोग्य सुधारेल. व्यवसायात पैसे अडकू शकतो. दुपारनंतर धार्मिक कार्यात रस वाढेल. कुटुंबाचा पाठिंबा लाभेल. विद्यार्थी स्पर्धां परिक्षेत चांगली कामगिरी करतील.
मीन राशी
तुमची दैनंदिन दिनचर्या गोंधळलेली असेल. आरोग्याची समस्या जाणवेल. दुपारनंतर तुम्हाला कामात यश मिळेल. घरात आनंदाची बातमी येईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.









