Horoscope 25 September 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील गुरुवार, जाणून घ्या राशीभविष्य

---Advertisement---

 

मेष : छोट्या गोष्टींवरून नाराज होऊन वाद घालू नका, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसाय चांगला चालेल. पण विरोधकांवर नजर ठेवा. नोकरीत अनुकूल बदल होतील. योगा आणि ध्यान केल्याने तणाव कमी होईल.

वृषभ : कुटुंबातील सदस्यांमुळे थोडी व्यस्तता वाढेल. मार्केटिंग आणि पेमेंट मिळवण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमच्या प्रयत्नांमुळे रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील.

मिथुन : विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. कुटुंबाशी चांगले संबंध ठेवा. मालमत्तेच्या वादापासून दूर राहा. व्यवसायात खूप काम असेल. पण त्याचे चांगले परिणाम मिळतील.

कर्क : आयात-निर्यातीच्या व्यवसायात विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नोकरदार वर्गाचा रखडलेला पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल.

सिंह : तुमची गोपनीयता जपून ठेवा. शेजाऱ्यांशी वादापासून दूर राहा. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. नवीन कामाची सुरुवात यशस्वी होईल, आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरेल.

कन्या : इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्याने खर्च वाढेल. प्रतिस्पर्धकांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

तुळ : जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो, म्हणून शांत राहा. खर्चाकडे लक्ष द्या. व्यावसायिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा, एक छोटीशी चूक मोठे नुकसान देणारी ठरु शकते.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्कोणत्याही नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. व्यवसायात सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान जाणून घेणे आवश्यक आहे. नोकरीत प्रगतीचे योग आहेत. मोठी डील होऊ शकते.

धनु : मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित कामांमध्ये यश मिळणार नाही. कुटुंबात गैरसमज होण्याची शक्यता आहे.

मकर : शांत आणि संयम ठेवून काम केल्यास यश मिळेल. व्यवसायात काही कामे धराने घ्या. कुटुंब आणि प्रियजनांसोबत आनंदी क्षण घालवा. बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ : आर्थिक चिंता असू शकते. व्यवसायात थोडेसे बदल करणे आवश्यक आहे. तुमच्या कोणत्याही समस्येसाठी जीवनसाथीचा सल्ला खूप फायदेशीर ठरेल.

मीन : कौटुंबिक व्यवसायात यश मिळेल, पण तरीही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---