---Advertisement---
Horoscope 29 September 2025 : पंचांगानुसार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी आश्विन शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. या दिवशी मूळ नक्षत्र आणि सौभाग्य योग जुळून येत आहे. सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी अभिजित मुहूर्त सकाळी ११:४४ ते दुपारी १२:३१ पर्यंत राहील. राहुकाल सकाळी ७:४१ ते सकाळी ९:१० पर्यंत राहील. या दिवशी चंद्र धनु राशीत भ्रमण करेल. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीसाठी कसा राहील हा दिवस.
मेष- काही नवीन काम सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रकरणातून तुम्हाला दिलासा मिळेल.
वृषभ- आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चिक राहील. भागीदारीत केलेले काम नुकसान देईल. कौटुंबिक निर्णय विचारपुर्वक घ्या. तुमचे विरोधक तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात.
मिथुन- आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदी राहील. तुम्हाला घरातील आणि बाहेरील कामात संतुलन राखावे लागेल. कामात जोडीदाराची पुर्ण साथ लाभेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते, ज्यामुळे तुमची धावपळ होईल.
कर्क– सेमवारची दिवस कठोर परिश्रमाचा असेल. तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. तुमच्या अनुभवांचा तुम्हाला पूर्ण फायदा होईल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित खटला तुम्ही जिंकण्याची शक्यता आहे.
सिंह- कोणत्याही कामात निष्काळजीपणा टाळावा. तुम्हाला सरकारी योजनांचा पूर्ण फायदा होईल. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही कामासाठी बाहेर जावे लागू शकते.
कन्या- आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरुपाचा राहील. जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासाची योजना आखू शकता, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
तूळ- नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. एखादे प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते, जे तुम्हाला आनंद देईल.
वृश्चिक- आज तुमची निर्णय घेण्याची क्षमता चांगली राहील. कोणतीही कामे उद्यापर्यंत पुढे ढकलू नका. कामात काही अडथळे येऊ शकतात, पण काळजी करू नका. तुमचा आळस दूर करा आणि तुमचे काम पुर्ण करा.
धनु- तुम्ही धार्मिक कार्यात मग्न राहाल. वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळेल. विद्यार्थी सरकारी नोकरीच्या परीक्षांची तयारी करण्यात मेहनती असतील. प्रवास करताना तुम्हाला काही माहिती मिळेल.
मकर- आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येईल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. प्रेमात असलेल्यांच्या जोडीदारासंबंधी इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्ही नवीन घर, दुकान किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.
कुंभ- आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. उत्पन्न आणि खर्चाचे संतुलन राखा. तुम्हाला तुमच्या मुलाच्या आरोग्याबद्दल थोडे सावध राहावे लागेल. मीन– सोमवारचा दिवस तुमच्यासाठी इच्छा पूर्ण करणारा ठरेल. विद्यार्थी अभ्यासात पूर्णपणे व्यस्त असतील आणि स्पर्धांमध्येही भाग घेऊ शकतात. कौटुंबिक संघर्ष पुन्हा उद्भवतील, परंतु वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही ते सहजपणे सोडवू शकाल.
मीन– सोमवारचा दिवस तुमच्यासाठी इच्छा पूर्ण करणारा ठरेल. विद्यार्थी अभ्यासात पूर्णपणे व्यस्त असतील आणि स्पर्धांमध्येही भाग घेऊ शकतात. कौटुंबिक संघर्ष पुन्हा उद्भवतील, परंतु वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही ते सहजपणे सोडवू शकाल.
---Advertisement---