---Advertisement---

हॉटेल चे बिल देण्याचा वाद : एकास मारहाण : दोघे अटकेत

by team
---Advertisement---

भुसावळ : हॉटेलचे बिल देण्याच्या वादातून एकावर हल्ला करण्यात आला. ही घटना रविवार, ८ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या मारहाणीच्या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यात आजीम शेख व भूषण होंडाळे यांना अटक करण्यात आली. या दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, समाधान अशोक निकम (३३ , आंबेडकर नगर, रेल्वे हॉस्पीटलमागे, भुसावळ) हे  रविवार, ८ रोजी रात्री मित्रांसह नागपूर महामार्गावरील हॉटेल चाहेलवर जेवणासाठी गेले होते. यावेळी संशयीतानी बिल देण्याच्या कारणावरून समाधान निकम सोबत बाचाबाची केली.

संशयीत अजीम शेखसह त्याच्या साथीदारांनी लाकडी दांडा व लोखंडी रॉडने मारहाण करीत समाधान निकमचा पाय फ्रॅक्चर केला तसेच डाव्या डोळ्यावर व दंडावरही दुखापत केली. याप्रकरणी संशयीत अजीमसह त्याच्या साथीदारांविरोधात बाजारपेठ पोलिसात समाधान निकम याने तक्रार दिली असता

गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment