भावाच्या पत्नीला पळवले; संतापलेल्या नातेवाईकांनी घर गाठलं अन्…, गुन्हा दाखल

---Advertisement---

 

नंदुरबार : भावाच्या पत्नीला पळवून घेऊन गेल्याच्या कारणातून एकाच्या घरात घुसून वाहनांची तोडफोड व शेतमालाचे नुकसान केले. ही घटना गेंदा पाटीलपाडा (ता. धडगाव) येथे घडली. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रानुसार, धडगाव तालुक्यातील गेंदा पाटीलपाडा येथील वसीबाई पावरा यांचे पती भाईदास पावरा यांच्यावर गावातीलच एकाच्या भावाच्या पत्नीस पळवून घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला होता.

यातून २५ सप्टेंबर रोजी सीमा मालसिंग पावरा, प्रताप दग्या पावरा, दिलीप बुकड्या पावरा, हुरत्या जया पावरा यांनी त्यांच्या घरावर हल्ला चढवला होता. घटनेच्या एक महिन्यानंतर सोमवारी वसीबाई भाईदास पावरा यांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सीमा मालसिंग पावरा (२९), प्रताप दग्या पावरा (३०), दिलीप बुकड्या पावरा (३२), हुरत्या जया पावरा (५०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

चारचाकी गाडी जाळली

या हल्ल्यात संशयितांनी भाईदास पावरा यांच्या किराणा दुकानात प्रवेश करून नासधूस केली होती. तसेच त्यांच्या (एमएच ०६ एडब्ल्यू ६१८१) या चारचाकी वाहनाला आग लावली होती. बोटीच्या इंजिनची टाकी फोडून घरातील शेळी व बोकड जबरीने घेऊन गेले होते. दोन एकर मका पिकाचे नुकसान केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---