मोठी बातमी ! बेंगळुरूत इमारत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू, 17 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

#image_title

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे मोठी दुर्घटना घडली आहे. कर्नाटकात सुरू असलेल्या पावसामुळे बेंगळुरूमधील हेन्नूरजवळील बाबूसाबापल्यातील एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, ज्यामध्ये किमान 3जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाने घटनासथळी धाव घेतली आहे.

हा अपघात झाला तेव्हा इमारतीत 20 हून अधिक लोक काम करत होते. आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजूनही 17 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथक युद्ध पातळीवर सुरु आहे . या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मदतकार्याला गती देण्याचे आणि सर्व जखमींना चांगले उपचार देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. डीसीपी देवराज यांनी सीएम आणि डीसीएमला सांगितले की, अजूनही 17 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचाव आणि मदतकार्य तीव्र करण्यात आले आहे. कर्नाटकात तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.