नवी दिल्ली: टोमॅटोनंतर परत एकदा कांद्याच्या दरामध्ये भाव वाढ झाल्याने गृहिणीचा बजेट कोलमडला आहे. आणि सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे.बाजारपेठे मध्ये टोमॅटोचे भाव कमी होत आहेत, तर कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. जुलै महिन्यात टोमॅटोचे दर 250 रुपये किलोच्या वर गेले होते.
मागच्या महिन्यात कांद्याचे दर अडीच पटीने वाढले आहेत किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्क्यांपर्यंत कर लावण्याची घोषणा केली आहे. जास्त मागणी आणि कमी पुरवठा यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून दररोज 15 टन कांद्याची आवक होत आहे. बाजारात निकृष्ट दर्जाचा कांदा 25 ते 30 रुपये किलोने विकला जात आहे.
काही आठवड्यांपूर्वी शेतकऱ्यांकडून 5 किलो कांदा 100 रुपयांना मिळत होता.आता शेतकरी 3 किलो कांदा 100 रुपयांना विकत आहे. कांद्याच्या वाढत्या किमतींबाबत एका शेतकऱ्याने सांगितले की, “कमी उत्पादनामुळे गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव वाढत आहेत आणि येत्या काही दिवसांतही हाच ट्रेंड कायम राहणार आहे. 20 ऑगस्ट रोजी बी ग्रेड कांदा 19 रुपये किलोने विकला जात होता. 1 सप्टेंबरपर्यंत त्याची किंमत 44 रुपये प्रति किलो झाली आहे.