Saif Ali Khan: काटेकोर सुरक्षा तरीही हल्लेखोर 12 व्या मजल्यावरच्या घरात गेला कसा ?

#image_title

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानयाच्यावर मध्यरात्री 2.30 वाजता एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. खान याच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली. काल मध्यरात्री त्याच्या घरात घुसलेल्या एका चोराने सैपवर चाकून 6 वार केले, ज्यामध्ये तो बराच जखमी झाला. हल्लेखोर हा चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता की त्याचा दुसरा काही हेतु होता हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, पण तो हलेल्खोर रात्रभर सैफच्या घरातच दबा धरून बसला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या सात टीम कामाला लागली आहे. क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सैफ अली खानच्या घराबाहेर पोलीस तपास करत आहे.

मात्र मुंबईतील वांद्रे येथे राहत असलेल्या इमारतीत १२ व्या मजल्यावर घर असताना चोराने एन्ट्री केली कशी? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेनंतर मुंबईच्या गुन्हे शाखा पोलिसांकडून यासंदर्भातील तपास सुरू आहे. या सैफ अली खानच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या इमारतीचीही तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीच्या शेजारी लहान दोन ते तीन मजली इमारत आहे. तिथे गुन्हे शाखेचे पोलीस दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा चोर नेमका कोणत्या रस्त्याने घरात शिरला असावा? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

सैफ अली खानच्या मानेवर प्राणघातक वार

या अज्ञात व्यक्तीला सर्वातप्रथम घरात काम करणाऱ्या मोलकरणीने पाहिले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. अज्ञात व्यक्तीने मोलकरणीच्या हातावर चाकूने वार केला. यामुळे मोलकरणीने आरडाओरडा सुरु केला. मोलकरणीच्या मदतीसाठी सैफ अली खान बाहेर धावून आला. यानंतर सैफ अली खान आणि अज्ञात व्यक्तीमध्ये झटापट झाली. या झटापटीत अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या हातावर, पाठीवर, मानेवर प्राणघातक वार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.