घरात पाळीव प्राणी असणे कसे फायदेशीर? जाणून घ्या

 तरुण भारत लाईव्ह । ६ जानेवारी २०२३। कोणाला पाळीव प्राण्यामध्ये कुत्रा किंवा मांजर आवडत असते. घरात पाळीव प्राणी असले आपली जबाबदारी वाढते. त्यांना वेळेवर खायला देणे, त्यांना फिरायला घेऊन जाणे, त्यांची योग्य ती काळजी घेणे. यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. पण तुम्हाला माहित आहे का? घरात पाळीव प्राणी असणे खूप फायदेशीर असते. घरात पाळीव प्राणी असल्यामुळे तुमचा एकटेपणा दूर होतो तसेच याचे अनेक फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया.

मांजर किंवा कुत्रा यासारखे पाळीव प्राणी घरात असल्यावर तुमचा एकटेपणा दूर होतो. जे लोक आपल्या घरापासून कामानिमित्त दूर आहेत अशा लोकांनी घरात पाळीव प्राणी ठेवणे गरजेचे आहे. यामुळे तुमचा एकटेपणा दूर होऊन तुम्ही आनंदी राहता. घरात पाळीव प्राणी ठेवल्याने तुमचा मूड चांगला होतो तसेच तुमचे मानसिक आरोग्य सुधारते. पाळीव प्राणी भावनिक आणि सामाजिक संबंध वाढवतात. ज्यामुळे आरोग्याला चालना मिळते. तसेच पाळीव प्राण्याच्या आसपास राहिल्याने मानसिक ताण कमी होतो. यामुळे मानसिक शांतता लाभून हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो.

पाळीव प्राण्यांसोबत फिरायला जाणे त्यांच्यासोबत वेळ घालवणे या गोष्टी सुद्धा तुम्हला आनंद देऊ शकतात. ज्यामुळे तुमचा मूड नेहमी चांगला राहून तुम्ही प्रत्येक गोष्टीत लक्ष केंद्रित करू शकाल. यामुळे तुमचे हॅपी हार्मोन्स निर्माण होतात. आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स निर्माण होणे हे खूप महत्वाचे असते. पाळीव प्राण्यांची लहान बाळांसारखी काळजी घायची असते त्यामुळे बरेचसे लोक हे पाळीव प्राणी घरात ठेवणं हे टाळत असतात, पण पाळीव प्राणी पाळणं हे आपल्यासाठी शारीरिक तसेच मानसिक गोष्टीसाठी खूप फायदेशीर आहे.