तरुण भारत लाईव्ह
Hasan Mushrif भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवारी करावी लागलेल्या नेत्यांची केवळ जामिनावर सुटका झाली तरी विजयोत्सव साजरा करून, स्वातंत्र्ययोद्ध्याच्या थाटात अशा नेत्यांचे सत्कार सोहळे आयोजित करण्याची प्रथा जेव्हा महाराष्ट्रात सुरू झाली, तेव्हा भ्रष्टाचाराच्या आरोपांची लाज वाटणे बंद झाले. Hasan Mushrif उलट भ्रष्टाचाराचा आरोप जेवढा गंभीर आणि घोटाळ्याची व्याप्ती जेवढी मोठी, तेवढे एखाद्या नेत्याचे राजकीय वजन अधिक असाच समज रूढ होऊ लागला आणि तुरुंगवारी करून बाहेर आल्यानंतर अशा नेत्यांची माथी अधिकच उजळली. Hasan Mushrif काही जाज्ज्वल्य राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याचे भासवीत, प्रतिमानिर्मितीचे वेगवेगळे प्रयोग केले जात असल्याने आता असे भ्रष्टाचारी नेते भविष्यात आदर्श बनण्यासाठी एक संथ प्रयत्न सुरू झाला आहे आणि ते अधिक चिंताजनक आहे.
Hasan Mushrif कोणे एकेकाळी, म्हणजे जेमतेम साडेचार दशकांपूर्वी, क्वात्रोची नावाच्या दलालामार्फत केलेल्या बोफोर्स तोफांच्या खरेदी व्यवहारातील दलालीचा काही हिस्सा मिळाल्याच्या आरोपावरून तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांना उभ्या देशाने धारेवर ध़रले होते आणि या व्यवहाराच्या वादळात राजीव गांधी यांच्यासह काँग्रेसलाही प्रतिमाभंजनाचा अनुभव घ्यावा लागला होता. काळ वेगाने पुढे सरकत असतो, हेच खरे. Hasan Mushrif राजकारणातील काळ तर इतिहासाला मागे टाकण्यासाठीच धडपडत असतो. त्यामुळे त्याचा वेग तर वादळीच असतो. ज्या काळात काही लाखांच्या दलालीच्या आरोपावरून देशाच्या राजकारणात रणकंदन माजले, तो काळ मागे गेला आणि नव्या काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपातील लाखोंच्या घोटाळ्याची थट्टा होऊ लागली. Hasan Mushrif शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्यावरील कारवाईत साडेअकरा लाख रुपयांची रोकड सापडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, ईडीने राईचा पर्वत केल्याच्या प्रतिक्रिया काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्या होत्या. Hasan Mushrif त्यामुळे अशी काही लाखांची रोकड किंवा काही कोटींचा घोटाळा आजकाल नेत्यांची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी पुरेसा नाही, अशीच एकंदर भावना बळावलेली दिसते.
नेत्यांच्या घोटाळ्याचा आकडा जेवढा मोठा, तेवढी त्याची राजकीय उंची आणि प्रतिष्ठा अधिक असे नवे समीकरण रूढ होऊ लागले असून, हे चिंताजनक आहे, असे कोणासच वाटू नये, हे अनाकलनीय होत आहे. Hasan Mushrif कमी रकमेच्या घोटाळ्यांच्या बातम्यांचे महत्त्वदेखील अलीकडे कमी झाले असून, अशा घोटाळ्यांच्या बातम्या महत्त्वक्रमानुसार मागे पडू लागल्या आहेत. समाजातदेखील अशा घोटाळ्यांची फारशी दखल घेतली जात नसल्याचे चित्र तयार होऊ लागले आहे. म्हणूनच, राजकारणात सरावलेली आणि रूढ झालेली घोटाळा- संस्कृती भविष्यात समाजालाही फरफटत कोठे घेऊन जाणार, याचा अंदाज करणे आज अवघड होऊ लागले आहे. Hasan Mushrif गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप झाले, त्यावरून त्यांना तुरुंगवारीदेखील झाली आणि प्रत्येक तुरुंगवारीच्या वेळी अशा नेत्यांच्या समर्थनाची स्पर्धा राजकारणात सुरू झाली. Hasan Mushrif छगन भुजबळ यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांचे नेतृत्व अधिक उजळवण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला. शिवसेनेचे संजय राऊत हे तर राजकीय आंदोलन करून तुरुंगात गेले असावेत अशाच थाटात आता वावरत असून, तुरुंगातील अनुभवांचे आत्मकथन लिहून समाजास एक वेगळी दृष्टी देण्याचाही त्यांचा इरादा असल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे.
Hasan Mushrif अनिल देशमुख यांची जामिनावर मुक्तता होणार, हे स्पष्ट होताच, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनकाळात सरकारी विमानाची मागणी करून देशमुखांच्या स्वागतासाठी तुरुंगस्थान गाठले. देशमुखांची मिरवणूक ही त्या वेळेची सर्वांत मोठी बातमी ठरली होती. अशा घटनांतून समाजाने काय बोध घ्यावा, राजकारणाने समाजासमोर कोणते आदर्श उभे करावेत, असे प्रश्न आज विचारले जात नसल्याने घोटाळ्यांच्या किंवा भ्रष्टाचाराच्या गांभीर्याचे खच्चीकरण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याच्या शंकेस पुरेशी पुष्टी मिळते. Hasan Mushrif घोटाळ्याच्या आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अग्रेसर ठरू पाहत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नेते व उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारातील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने पुन्हा छापे घातले आणि मुश्रीफ यांच्या प्रतिमानिर्मितीचा नवा प्रयत्न पुन्हा सुरू झाला. सक्तवसुली संचालनालयाने हे छापे घालून मोठी चूक केली, असा निवाडाही काही नेत्यांनी देऊन टाकला. मुश्रीफ यांच्याशी संबंधितांवर मनी लाँडरिंग म्हणजे पैशांच्या हेराफेरीचे आरोप आहेत. Hasan Mushrif मुश्रीफ यांच्याशी संबंधितांच्या साखर कारखान्यातील कथित अनियमिततेचाही या कारवाईतून शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात येते.
मात्र, कारवाई सुरू होताच राजकीय आक्रोश सुरू होऊन, विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याचा पठडीबाज आरोप करीत मुश्रीफ यांच्या समर्थनाची स्पर्धा विरोधकांत सुरू झाली. Hasan Mushrif निषेधाचे खलिते जारी होऊ लागले आणि कारवाईमागील आरोपांना राजकीय रंग देऊन मूळ आरोप दडविण्याचे प्रयत्न होऊ लागले. पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपाविरोधात आकांडतांडव करून आरोपांची धार कमी असल्याचे भासविण्याचा खेळ सुरू झाला आणि घोटाळ्यांच्या आरोपातील नेत्यांच्या प्रतिमानिर्मितीसाठी वारंवार केले जाणारे प्रयोग नव्या थाटात सुरू झाले. काही नेत्यांनी तर मुश्रीफ यांच्यावरील कारवाई म्हणजे सहकार चळवळ संपविण्याचे कारस्थान असल्याचे सांगत मुश्रीफ यांची सहकार क्षेत्रातील प्रतिमा उंचावण्यास हातभार लावला. Hasan Mushrif खरे म्हणजे, सक्तवसुली संचालनालय, आयकर विभाग किंवा कोणत्याही तपास यंत्रणेची कारवाई ही आरोपांच्या आणि तक्रारींच्या आधारावर होत असते. त्यामध्ये तथ्य आढळल्यास कारवाई, अटक आणि खटला अशी प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे केवळ तपासाकरिता घातल्या गेल्या धाडींचा गवगवा करीत राजकीय कांगावा करण्याऐवजी, आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची पुरेपूर संधी असल्याच्या भावनेने त्या कारवाईस सहकार्य करणे अधिक उचित ठरते.
Hasan Mushrif आजवरच्या सर्व कारवायांत मात्र निर्दोषत्व सिद्ध करून उजळ माथ्याने बाहेर पडण्याची उदाहरणे आढळत का नसावीत, हा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती दिसते. सध्या जामिनावर बाहेर असलेल्या नेत्यांच्या निर्दोषत्वाचा स्पष्ट निर्वाळा न्यायव्यवस्थेने दिलेला दिसत नाही. Hasan Mushrif तरीही घोटाळ्याच्या आरोपांचे डाग अंगावर असलेले अनेक नेते उजळ माथ्याने समाजास सुसंस्कृततेचे आणि राजकारणातील साधनशुचितेचे धडे देण्यासही मागेपुढे पाहत नसल्याने, सुसंस्कृतता व साधनशुचितेच्या व्याख्यांनीच नवे अवतार घेतले की काय, असे वाटू लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरील छापेमारीची ही पहिली वेळ नाही. सक्तवसुली संचालनालयाची ही कारवाई खुद्द मुश्रीफ यांनादेखील अगदीच अनपेक्षित नसावी. Hasan Mushrif त्यांच्यावरील आरोपांची बीजे सुमारे पाच वर्षांपूर्वीच, त्यांच्याशी संबंधित असलेल्या काही निकटवर्तीयांच्या व्यवहारांतून रुजलेली आहेत. मुश्रीफ यांच्या नातेवाईकांचा संबंध असलेल्या छत्रपती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांविषयीची तक्रार पाच वर्षांपूर्वीच कंपनी रजिस्ट्रारकडून पुणे पोलिसांकडे दाखल केली गेली होती. अशीच आणखी एक तक्रार गेल्या वर्षी पुणे येथील विशेष न्यायालयातही दाखल झालेली होती.
आता त्यासंबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. Hasan Mushrif त्यामुळे मुश्रीफ यांना राजकीय कांगावा करण्यापेक्षाही, निर्दोषत्व सिद्ध करण्याची कायदेशीर संधी उपलब्ध आहे. असे असतानाही, मुश्रीफ यांनी आणखी एका कांगाव्याची भर घातली आहे. अल्पसंख्यकांना लक्ष्य केले जात असल्याचा नवा आरोप करून आता या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही एक नवा प्रकार अस्तित्वात आणला गेला आहे. Hasan Mushrif वस्तुत:, घोटाळ्यांना, भ्रष्टाचारास आणि गुन्हेगारीस धर्म नसतो, असे त्यांच्याच पक्षाचे नेते वारंवार सांगत असतात. याआधीच्या अनेक दहशतवादी घटनांना धार्मिक रंग लावण्यास या नेत्यांनी नकार दिला होता आणि विशिष्ट धर्मांच्या लांगूलचालनी वृत्तीचे प्रदर्शनही घडविले होते. Hasan Mushrif याच प्रवृत्तींनी पुढे मात्र हिंदू दहशतवाद किंवा भगवा आतंकवाद नावाची एक नवी व्याख्यादेखील निर्माण करून दहशतवाद किंवा गुन्हेगारीस हिंदू धर्माशी जोडण्याचा उद्दामपणा केला होता. Hasan Mushrif अशा दुटप्पीपणाचे पुढचे पाऊल म्हणून मुश्रीफ यांच्या या हास्यास्पद विधानाकडे पाहावे लागेल. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो आणि धर्माची किंवा सामाजिक संख्यावादाची ढाल पुढे करून तो लपविता येत नसतो. त्यासाठी कायदेशीर आणि सनदशीर मार्गांनी आपले निर्दोषत्व सिद्ध करणे, हाच एक उपाय असतो.
Hasan Mushrif असे असताना आता अचानक आपल्यावरील कारवाईस धार्मिक रंग देऊन त्याला राजकीय वळण देण्याचा जुनाच खेळ पुन्हा खेळला जात असेल, तर त्यामागील हेतू ओळखायला हवा. Hasan Mushrif राजकारणात कुरघोडीचे खेळ चालतच असतात. प्रतिस्पर्धी पक्षांची ताकद क्षीण करण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांकडून होत असतात. सत्तास्थापनेसाठी एकत्र आल्यानंतरदेखील महाविकास आघाडीतही हाच खेळ रंगला होता आणि या आघाडीतील तीन पक्ष एकत्र असूनही एकमेकांकडे त्याच संशयाने पाहत होते. Hasan Mushrif राष्ट्रवादीने काँग्रेसचे खच्चीकरण केल्याची भावना काँग्रेसमध्ये खदखदत होती आणि शिवसेनेत तर याच भावनेतून उभी फूट पडली होती. त्यामुळे, एखादा राजकीय पक्ष अन्य प्रतिस्पर्ध्याची शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न करीत असेलही, पण त्या राजकारणाचा भ्रष्टाचार qकवा घोटाळ्यांच्या समर्थनाकरिता वापर करणे नीतीला धरून नाही. मुश्रीफ यांनी किंवा त्यांचे समर्थन करीत राजकारण करणाèया प्रत्येक नेत्याने याची जाणीव ठेवावयास हवी. अन्यथा, राजकारणात रुजू लागलेल्या भ्रष्टाचाराच्या शिष्टाचारातून नवी विकृती निर्माण होईल. Hasan Mushrif मुश्रीफ यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा संस्कृती की विकृती यापैकी नेमका पर्याय निवडण्याची संधी राजकारणास प्राप्त झाली आहे. तिचे सोने करायचे की माती हे ज्याने त्याने ठरवावे!