---Advertisement---

Alphonso Mango Tips : अस्सल हापूस कसा ओळखायचा? जाणून घ्या या ८ टिप्स

by team
---Advertisement---

How To Identify Alphonso Mango : उन्हाळा म्हटलं की आंबा प्रेमींसाठी हा मोसम म्हणजे पर्वणीच असते. आंबा हे किती लोकप्रिय आणि अनेकांचं आवडतं फळ आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. आंबा हा फळांचा राजा आहे, असं म्हणतात. आंब्यांचा गोडवा आणि त्याची चव अनेकांची आवडती असते. या फळासाठी म्हणून अनेक लोक उन्हाळ्याची वाट पाहत असतात. उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या या फळासाठी लोक आसुसलेले असतात, वर्षभर वाट पाहतात. बाजारांत आंबा विकायला येताच तो खरेदी करण्यासाठी सगळ्यांची झुंबड उडते.

आंब्यांच्या ऋतूंमध्ये बाजारांत वेगवेगळ्या प्रजातींचे आंबे विकायला येत असतात. हापूस, दशेरी, तोतापुरी, रायवळ, पायरी असे असंख्य प्रकारचे आंब्यांचे प्रकार बाजारात विकायला असतात. आंब्यांचे कितीही प्रकार असले तरीही सर्वजण अस्सल हापूस आंब्यांच्याच प्रेमात असतात.

हापूस आंब्याच्या चवीने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. त्यामुळे या फळाची चव इतर कोणत्याही आंब्याच्या प्रजातीला येत नाही. हापूस आंबा कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे कोकणाव्यक्तिरिक्त या फळाची इतर कुठेही लागवड केली, तर त्याला विशिष्ट चव येत नाही. म्हणूनच हापूस आंब्याला कोकणचा राजा म्हणून ओळखतात. बहुतांश घरात अक्षय तृतीयापासून आंबा खायला सुरुवात करतात.

हापूस नेमका कसा ओळखायचा ?

१ . चांगल्या गुणवत्तेच्या हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो. त्या सुंगधामुळे तो दूरवरुनही ओळखता येतो. नैसर्गिकरित्या गवतामध्ये पिकवलेल्या आंब्याच्या सुगंध दूरपर्यंत पसरतो.

२ . इतर भागातून येणारे आंबे जे हापूस आंब्यासारखे दिसतात मात्र त्याला अजिबात सुगंध नसतो किंवा फार थोडाच सुगंध येतो. हे आंबे रासायनिक पद्धतीचा वापर करुन पिकवलेले असल्याने ते सुगंध देत नाहीत.

३ . नैसर्गिकरित्या पिकवलेले आंब्यांना स्पर्श केल्यानंतर ते मऊ असल्याचे जाणवतात. तर रासायनिकरीत्या पिकलेले आंबे पिवळे, पण कठोर असतात.

४ . नैसर्गिक पद्गतीने पिकलेल्या हापूस आंब्याचा रंग हा पिवळसर असून फिकट हिरवा असतो. तर रासायनिकरीत्या पिकलेले आंबे हे एकाच रंगाचे दिसतात.

५ . पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर लागत नाही.

६ . हापूस आंब्याचा सुगंध आणि त्याचा केशरी रंग असलेला गर यावरूनही आपण सहजरित्या ओळखू शकतो.

७ . एका मोठया भांड्यात पाणी घेऊन त्यात आंबा बुडवा, जर आंबा बुडाला तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला आहे. मात्र जर आंबा तरंगत राहिला तर तो रासायनिक पद्धतीने पिकवलेला असेल असही म्हटलं जात.

८ . शिवाय जर आपली नजर चांगली असेल तर आंब्याच्या पेटीतील वर्तमानपत्रातूनही त्याची ओळख स्पष्ट होते. त्यात कुठले वर्तमानपत्र वापरले आहे त्यावरून सुद्धा तो आंबा कुठल्या भागातून आला आहे हे देखील कळते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment