तरुण भारत लाईव्ह । १३ जानेवारी २०२३। हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. असा सल्ला डॉक्टर देत असतात म्हणजे, उदा. बाजरी, बाजरीची भाकरी, बाजरी ची खिचडी, बाजरीचे वडे असे पदार्थ खाल्याने शरीरामध्ये उष्णता टिकून राहते. बाजरी ही कॅल्शियम, लोह, प्रोटिन, फायबर असे अनेक गुण बाजरीमध्ये असतात. म्हणून बाजरीची एक सोप्पी रेसिपी आपण पाहूया.
बाजरीची लापशी
साहित्य: बाजरीचे जाडसर पीठ, गूळ, पाणी, वेलची पूड, जायफळ, साजूक तूप.
कृती: प्रथम एक ग्लास पाण्यात आवडीनुसार गूळ घालून ते पाणी उकलून घ्या नंतर बाजरीचे जाडसर पीठ साजूक तुपात खरपूस भाजून घ्यावे. गुळाचे उकळलेले पाणी हळूहळू भाजलेल्या पिठात सोडावे व चमच्याने ते सारण ढवळत रहावे जेणेकरून त्या सारणात गाठी पडणार नाही याची काळजी घ्यावी वरून चवीनुसार वेलची पूड घालून चिमूटभर मीठ घालावे. वरून आवडीनुसार सुकामेवा घालून गरम गरम बाजरीची लापशी सर्व्ह करावी.