तिळाचे लाडू कसे बनवायचे?

तरुण भारत लाईव्ह । १२ जानेवारी २०२३ । संक्रांत हा सण अगदी काही दिवसांवर आला आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत आपण संक्रांत हा सण साजरा करत असतो. तिळगुळाची वडी, लाडू, तिळाची पोळी असे अनेक पदार्थ आपल्याला संक्रांतीच्या दिवशी खायला मिळतात.  जसे आपण त्यादिवशी टीळाचे पदार्थ खात असतो त्याचप्रमाणे आपण जर तिळाचे लाडू या संक्रांति ला ट्राय केले तर ? घरच्याघरी बनवलले साजूक तुपातले तिळाचे लाडू हे घरी बनवायला पण खूप सोप्पे आहे. चला तर मग जाणून घेऊया कि तिळाचे लाडू हे कसे बनवले जातात.

साहित्य: तीळ, गुळ, शेंगदाणे, सुके खोबरे, साजूक तूप, चवीनुसार वेलची पावडर

कृती : प्रथम एका कढई मध्ये शेंगदाणे खरपूस भाजून घ्या शेंगदाणे भाजून झाल्यावर आणि थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्या.त्यांनतर त्याच कढई मध्ये तीळ भाजून घ्या तीळ भाजून झाल्यावर तीळ थंड करायला ठेवा. यांनतर सुके खोबरे किसून घ्या. मग भाजलेल्या शेंगदाण्यांना हलके कुटून घेऊ जेणेकरून त्यांचे फक्त एका दाण्याचे २ तुकडे होतील. त्यानंतर कढई मध्ये साजूक तूप टाका, मंद ते मध्यम आचेवर गूळ विरघळून घेऊ. आपण गुळ ५ मिनिटे शिजवून घेतला आहे. त्यानंतर त्यात वेलची पूड घालावी आणि गॅस बंद करावा या गुळाच्या पाकात बाकीचे सारे मिश्रण मिसळून घ्यावे. मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्यावे थंड झाल्यावर लाडू नीट वळता येत नाही. म्हणून आपण मिश्रण गरम असताना लाडू वळून घेऊ

लाडू वळताना आपल्या तळहातावर तूप लावावे आणि लाडू वळायला सुरवात करावी आणि छोटे छोटे लाडू बांधून घ्यावे.लाडू वळून झाले कि एका घट्ट हवाबंद झाकणाच्या डब्यात भरून ठेवावेत.