Census: देशात 2025 पासून जनगणना सुरु होणार; लोकसभा मतदारसंघही बदलणार, जातीय जनगनणा होणार का?

#image_title

Census To Start In 2025: देशात 2021 मध्ये होणारी जनगणना कोविड-19 महामारीमुळे लांबणीवर पडलेली होती. आता जनगणनेस सुरुवात होणार आहे. परंतु जनगणनेचे चक्र बदलणार आहे. नेहमी दहा वर्षांनी होणारी जनगणना यंदा 14 वर्षांनी होणार आहे.

2025 मध्ये सुरु होणार जनगणना 2026 पर्यंत चालणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये संप्रदायाची माहिती घेतली जाणार आहे. जनगणनेत आतापर्यंत धर्म आणि वर्ग विचारला जात होता. सामन्यपणे अनुसूचित जाती आणि जनजातीची गणना केली जात होती. परंतु यंदा संप्रदाय विचारला जाणार आहे. जसे कर्नाटकात सामान्य वर्गात असलेले लिंगायत समाज स्वत: वेगळा संप्रदाय मानतात. तसेच अनुसूचित जातीत वाल्मीकी, रविदासी सारखा संप्रदाय आहे. म्हणजेच आता धर्म, वर्ग सोबत संप्रदाय गणनेचा आधार असणार आहे. त्याबाबत सरकारचा विचार सुरु आहे.

दरम्यान, अनेक विरोधी पक्षांनी मागणी केलेल्या जात जनगणनेबाबत सरकारचा अद्याप निर्णय झालेला नाही. मिळालेल्या माहिती नुसार, जनगणनेमध्ये धर्म आणि जात विचारात घेतली जात असताना, यावेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे पालन करतात हे देखील विचारले जाऊ शकते.

2026 मध्ये जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या जागांचे सीमांकन सुरू होणार आहे. त्यानंतर हे काम 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. काँग्रेससह अनेक विरोध पक्ष आणि एनडीएमधील काही पक्षांनी जातीय जनगणनेची मागणीही केली आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.

2026 नंतर देशात 2035 नंतर 2045 आणि 2055 मध्ये पुढील जनगणना होणार आहे. यापूर्वी 1991, 2001, 2011 अशी जनगणना झाली होती.1891 पासून देशात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते.