---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह न्युज : टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा लि.चे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे मंगळवारी रात्री 29 नोव्हेंबर 2022 ला नवी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . ते 64 वर्षांचे होते. ३० नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता बंगळुरुमधील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.
भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी त्यांची देशभरात विशेष ओळख होती. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय विक्रम किर्लोस्कर यांना जातं. विक्रम किर्लोस्कर यांनी मॅसाचुय्सेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतून पदवी शिक्षण घेतलं होतं. MIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. किर्लोस्कर सिस्टीम्स लिमिटेडच्या अध्यक्ष आणि संचालकपदाचाही कार्यभार ते सांभाळत होते.
विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात त्यांची पत्नी गीतांजली आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे . नुकत्याच पार पडलेल्या Toyota Innova HyCross कार्यक्रमानिमित्त ते मुंबईत आले होते.
---Advertisement---