तरुण भारत लाईव्ह न्यूज : ज्येष्ठ साहित्यिक डॉ नागनाथ कोतापल्ले यांचे वयाच्या 74 व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले. नागनाथ कोतापल्ले यांची तब्येत स्थिर नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र तब्येत साथ देत नव्हती. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनावर साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, सून आणि नातवंडं असा परिवार आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द
नागनाथ कोतापल्ले 1977 साली मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक झाले. यांनतर कोतापल्ले यांची पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुखपदी निवड झाली. कोतापल्ले 2005-2010 या दरम्यान मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपदी राहिले. कोतापल्ले यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी हे प्राध्यापक ते कुलुगुरु अशी राहिली आहे.