जळगावात आढळले मानवी शरिराचे अवशेष; घटनेने परिसरात खळबळ

जळगाव : तालुक्यातील धानवड-पिंपळे शेत शिवारात मानवी शरिराचे अवशेष आढळले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अवशेष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आणण्यात आले आहे. याबाबत   एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटना कशी उघडकीस आली?

धनवड-पिंपळे शिवारातील एका शेतामध्ये जात असलेला तरुण शेतात मानवी शरिराचे काही अवशेष पाहून गोंधळला. त्यांनी त्वरित पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचले आणि तपासणी केली. त्याठिकाणी मानवी शरिरातील कवटी आणि हातापायासह इतर अवशेष दिसून आले. तत्काळ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविण्यात आले.

हेही वाचा : धक्कादायक! मुलांनीच संपवलं आईच्या बॉयफ्रेंडला, रस्त्यावरच केला थरारक हल्ला

पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन तपासणी केली. प्राथमिक तपासानंतर मानवी अवशेष जप्त करण्यात आले आणि ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : Virat Kohli Video : विराट कोहलीचं का होतोय कौतुक? पहा व्हिडिओ

या घटनेची सखोल तपासणी सुरू आहे. मृतदेह किती दिवसांपूर्वीचा आहे, तो पुरुषाचा आहे की स्त्रीचा, आणि मृत्यूचे कारण काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. मृतदेहाच्या अवशेषांची डीएनए चाचणी केली जाऊ शकते, ज्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात मदत होईल. दरम्यान, प्रशासन आणि पोलीस यंत्रणांकडून या घटनेची सखोल तपासणी सुरू आहे.