---Advertisement---
नंदुरबार : लाडक्या बहिणीच्या ई- केवायसीसाठी पतीकडून आधार कार्ड मागितल्याचा पतीला राग आल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना चिनोदा, ता. तळोदा येथे घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिनोदा येथील महिलेने आपल्या ई-केवायसीसाठी पतीकडे त्यांचे आधार कार्ड मागितले. पती निंबा महादू मराठे यांनी ते देण्यास नकार देऊन लाकडी काठीने आणि हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. पत्नीच्या फिर्यादीवरून पती निंबा मराठे विरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी खरेदीला नंदुरबारात प्रतिसाद
नंदुरबार : दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन बुकिंगला यंदाही प्रतिसाद मिळाला आहे. बाजारातील विविध कंपन्यांच्या शोरूममध्ये बुकिंग केलेल्या १५० पेक्षा अधिक दुचाकींची उचल ग्राहकांकडून करण्यात आली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीपर्यंत ३ हजार मोटारसायकल आणि स्कूटर दर्जाच्या वाहनांची उचल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ७०० पेक्षा अधिक वाहनांची पासिंग करून देण्यात आल्याची माहिती आहे. पेट्रोल गाड्यांसोबत ईलेक्ट्रिक दुचाकींनाही पसंती देण्यात येत आहे.